प्रा. मोहन ज्ञानदेवराव काळे यांना शिवांजली साहित्यपीठ साहित्य सन्मान पुरस्कार


 Sanjay Deshmukh  15 Mar 2025, 8:22 PM
   



अकोला : अकोला येथील सुप्रसिद्ध कवी, कथाकार, गझलकार, लेखक प्रा. मोहन ज्ञानदेवराव काळे यांना सौ. मोनिका अण्णासाहेब मटाले पुरस्कृत स्व. बबनराव मटाले स्मृती शिवांजली साहित्य सन्मान पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला. 
महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा चाळकवाडी-पिंपळवंडी, अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे शाखा चाळकवाडी-पिंपळवंडी -भोसरी यांच्यातर्फे जागतिक मराठी दिन व अभिजात मराठी भाषा गौरवार्थ आयोजित राज्यस्तरीय साहित्य सन्मान पुरस्कारासाठी संपूर्ण भारतातून साहित्य मागविण्यात आले होते. त्यात अकोला येथील सुप्रसिध्द साहित्यिक प्रा. मोहन ज्ञानदेवराव काळे यांच्या पळस फुलला या कथा संग्रहाची सौ. मोनिका अण्णासाहेब मटाले पुरस्कृत स्व. बबनराव मटाले स्मृती शिवांजली साहित्य सन्मान पुरस्कार २०२५ साठी निवड करण्यात आली व त्यांना शिवांजली साहित्यपीठ साहित्य सन्मान पुरस्कार ३२ व्या राज्यस्तरीय शिवांजली मराठी साहित्य महोत्सव, २०२५ चाळकवाडी पिंपळवंडी ता. जुन्नर जि. पुणे येथे सुप्रसिद्ध चित्रपट गीतकार, कवी, साहित्यिक श्री. प्रकाश होळकर, शिवांजली साहित्यपीठाचे अध्यक्ष शिवाजीराव चाळक यांच्या हस्ते व अनेक मान्यवर साहित्यिकांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. 
प्रा. मोहन ज्ञानदेवराव काळे यांच्या पळस फुलला या कथासंग्रहाला मिळालेला हा पाचवा पुरस्कार आहे. या आधी पळस फुलला या कथासंग्रहासाठी त्यांना अक्षरक्रांती आंतरराष्ट्रीय साहित्य सन्मान पुरस्कार नागपूर, वऱ्हाड विकास बहुउद्देशीय संस्थेचा मां जिजाऊ राज्यस्तरीय वाड्मय पुरस्कार, प्रज्ञा बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र यांचा राज्यस्तरीय साहित्य सन्मान पुरस्कार, मराठी साहित्य मंडळ ठाणे यांचा सावित्रीबाई फुले साहित्यभूषण पुरस्कार मिळालेले आहेत. प्रा. मोहन ज्ञानदेवराव काळे यांच्या कथा, कविता, गझल, समीक्षण, वैचारिक लेख सातत्याने अनेक वर्तमानपत्रे, नियतकालिके व दिवाळी अंकांमध्ये प्रकाशित होत असतात. अनेक राज्यस्तरीय संमेलनामध्ये तसेच ऑनलाईन, ऑफलाईन कवी संमेलन, गझल मुशायऱ्यांमध्ये तसेच साहित्यिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांमध्ये त्यांनी कविता सादरीकरण केलेले आहे. यावर्षी दिल्ली येथे पार पडलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्येही त्यांचा निमंत्रित साहित्यिक म्हणून सहभाग होता. ते अनेक साहित्य संस्थांशी जुळलेले आहेत. त्यांना मिळालेल्या या यशाबद्दल विदर्भ साहित्य संघ, अखिल भारतीय अंकुर साहित्य संघ, सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ, अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच, अक्षरक्रांती साहित्य संघ, युगंधर साहित्य संघ, मराठी साहित्य मंडळ, साहित्य, कला व्यक्तिमत्व विकास मंच, संत तुकोबाराय साहित्य परिषद, वऱ्हाडी कट्टा, काव्य प्रेमी साहित्य संघ, सॄजन साहित्य संघ, अखिल भारतीय पत्रकार महासंघातर्फे तसेच अनेक साहित्यिक मित्रांतर्फे त्यांचे अभिनंदन केल्या जात आहे. 
अजिंक्य भारत परिवारातर्फे त्यांचे अभिनंदन.

    Post Views:  95


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व