चौकशीच्या बुजगावण्याने आमदार नितीन देशमुखांच्याही राजकारणाला शह देण्याचे बंडखोर हस्तकांचे प्रयत्न!


प्रदुषित राजकारणाचा हलकट कोरोना अकोल्यातही पोहचला; लाचलूचपत विभागाकडून कारवाईचे फोन
 संजय देशमुख  20 Sep 2022, 10:01 AM
   

अकोला : अकोला जिल्ह्यात बाळापूर विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे निष्ठावंत आमदार नितीन देशमुख यांनाही आता लाचलूचपत विभागाकडून कारवाईचे एकप्रकारे धमकी वजा सुचनेचे फोन आलेले आहेत.म्हणजे खोके सरकारच्या  विकाऊ हस्तकांनी या प्रदुषित राजकारणाच्या हलकट कोरोनाचा संसर्ग अकोल्यातही पोहचविलेला असल्याचे उघड होत आहे. चौकशीतून काय निष्पन्न होणार हा भाग वेगळा. परंतू सध्याच सुरू होत असलेल्या चौकशा मात्र राजकीय कटकारस्थाने निश्चित असल्याची चर्चा जनमानसात सुरू आहे.आपणाकडे असणारे व्हिडीओ आपण जाहिर करून महाराष्ट्रात झालेले सत्तांतर अवैध असल्याचे सिध्द केले नाही तर प्रसंगी विधासभेतच  आत्महत्या करू असा इशारा यावेळी आवाहन देतांना आमदार नितीन देशमुख यांनी दिला आहे.
          जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून फक्त स्वत:चे राजकीय अस्तित्व अबाधित ठेवण्याच्या प्रयत्नात राजकारणी मश्गूल असणे हे राज्यातील जनतेचे दुर्दैव आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि जनतेच्या जीवनमानाच्या प्रश्नांना बगल देऊन भाजपचे मांडलिकत्व पत्करलेल्या लाचार,अति महत्वाकांक्षी तथा सत्तांतूर बंडखोरांनी सुरत गुवाहाटीची मौजमजा करून खोके हस्तगत करत अवैध मार्गाने महाराष्ट्राची सत्ता हस्तगत केली.त्या घटनाक्रमात नितीन देशमुखांनाही चौकशांच्या धमक्या देऊन सोबत नेले होते.त्यांना अडकवून ठेवण्यासाठी दवाखान्यात भरती करण्यापासून नानाविध प्रयत्न केले होते.परंतू स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवरील अपरिमित निष्ठा आणि उध्दव ठाकरेंवरील दृढ विश्वास कायम ठेवत ते बंडखोर गटाच्या तावडीतून अकोल्यात परतले. 
          त्यानंतर त्यांनी या विश्वासघातकी बंडखोरीचे वेळोवेळी  विश्लेषण करून खोके सरकार विरोधातही आक्रमक भूमिका कायम ठेवल्या. म्हणूनच त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची तक्रार लाचलूचपत विभागाच्या अमरावती कार्यालयात दाखल झाली. त्या प्रकरणात आपण वरच्या पातळीवर  जाऊन बोलून घ्या असे त्यांना सांगण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या विधानामुळे या विभागातील अधिकाऱ्यांचा वापर करून आमदार नितीन देशमुखांवर दडपण आणण्याच्या हलकट कटकारस्थानाचा प्रकार असल्याचे अंदाज व्यक्त होत आहेत.
         याविरूध्द आमदार नितीन देशमुख आक्रमक झालेले असून त्यांनी नारायण राणेंसारख्या नेत्यांना आव्हान दिले, आणि बंडखोरीच्या षडयंत्रांचे व्हिडीओ बाहेर काढण्याचा इशारा दिला आहे.दिड वर्षांपासून या खोक्यांच्या सत्तांतर कटकारस्थानांची आखणी  सुरू होती.त्याची संपूर्ण माहिती आपणाकडे असल्याचा गौप्यस्फोट देशमुखांनी  हे आव्हान देताना केला आहे. आपल्याकडे पिढीजात संपत्ती असून शेतजमिनी आहेत.माझ्याविरूध्द तक्रारी करणारे उपद्व्यापी  हे खंडणी बहाद्दर असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.त्यांना साथ देणारे  भुमाफिया लोकप्रतिनिधीही माझी तक्रार करण्याच्या पात्रतेचे नाहीत.अशी तक्रारकर्त्यांच्याही गुन्हेगारी मुखवट्यांची माहिती सुध्दा  आमदार देशमुख यांनी जाहिर केली आहे.
               भाजपशी घरोबा करून असंविधानिक मार्गाने सत्ता स्थापन झाल्यानंतर अनेक भ्रष्ट प्रवृत्तीच्या मनोवृत्ती आपलेही राजकीय बस्तान बसविण्याची स्वप्ने पाहू लागल्यात.त्यामुळे अगोदर शिवसेना आणि उध्दव ठाकरेंचा जयघोष करीत भाजप नेत्यांना शिव्या घालणाऱ्या अनेक लाचार दलबदलूंची बंडखोर शिंदेंच्या गटाकडे धाव घेण्याची चढाओढ लागली.खाली माना खालून एका मागोमाग धावणाऱ्यांमधून अद्याप सर्वांनाच प्रसाद मिळालेले नाहीत‌. तरी भाजपच्या दडपगीरी,धमक्या आणि चौकशांच्या षडयंत्रांनी तुर्त तरी हे चमत्कार घडविलेले आहेत.
        यामध्ये अकोला जिल्ह्यातून या प्रवाहासोबत फीतुरांच्या दरबारात हजेरी लावणारांनीही आपली नशीबे अजमावण्याचे प्रयत्न केलेले आहेत.त्यामुळे बंडखोर  गटाच्या अकोल्यातील हस्तकांनी हे उपद्व्याप करून आपल्याला कारवायांच्या धमक्या देऊन विचलित करण्याचे प्रयत्न चालविलेले आहेत.परंतू अशा प्रयत्नांना आपण भिक घालणार नाही.शिवसेना आणि उध्दव ठाकरेंच्या नेर्तृत्वावर आपला विश्वास असून मी सेनेचा नकली नव्हे तर असली वाघ आहे.त्यामुळे  बंडखोरांना घाबरून मी शिवसेना सोडेल हे स्वप्न खोकेबाज बंडखोरांनी कधीही पाहू नये.उलट  गुवाहाटी,सुरतपासून मी चित्रित केलेले सर्व व्हिडिओ बाहेर काढल्यावर या हलकट राजकाण्यांना जनतेसमोर तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही, असा इशारा आमदार नितीन देशमुख यांनी दिला आहे.

    Post Views:  533


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व