विश्वामित्र नदीच्या पुरातील महीलेचा मृतदेह अखेर शेतात मिळाला !
अकोला - नदीचे पाणी ओसरल्याने घटनास्थळावरून दिड किलोमीटर अंतरावर नदीच्या काठावरील कुंडाजवळील शेतात महीलेचा मृतदेह अडकलेल्या अवस्थेत आज सकाळी 7:30 वाजता गावक-यांना दीसला. मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी रात्री 11 वाजेपर्यंत बाहेरुन युटर्न ठिकाणांवर शोध घेतला असता काही मिळुन आले नव्हते. पुन्हा आज सकाळी रेस्क्यु बोटीसह टीम चानी येथे 9:00 पोहचली व सर्च ऑपरेशन चालू करणार होते. जिल्हाधिकारी अजित कुंभार सर तसेच निवासी जिल्हाधिकारी विजय पाटील सर यांच्या आदेशाने सर्च ऑपरेशन चालू होते. घटनाक्रम... काल दुपारी अकोला जिल्ह्य़ातील पातुर तालुक्यातील चान्नी येथील रहीवाशी रुक्मिणी दशरथ पवार वय 50 वर्ष ही महीला गावातुन वाहणा-या विश्वमत्रा नदिला आलेल्या पुरात वाहून गेल्याची माहीती पातुर तहसीलदार राहुल वानखडे सर आणी चानी पोलीस ठाण्याचे ठाणेदार रवींद्र लांडे यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे जिवरक्षक यांना माहीती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करीता पाचारण केले होते लगेचच दिपक सदाफळे यांनी आपले सहकारी अंकुश सदाफळे, निलेश खंडारे,विकास सदांशिव,यांचेसह शोध व बचाव साहित्य घेऊन रवाना केले होते रात्री अणेक ठिकाणांवरून मिळत असलेल्या लोकेशन नुसार नदीच्या काठावरील युटर्न ठिकाणांवर सर्च ऑपरेशन ने बटवाडी,तुलंगा येरीया सर्च केला पण काही मिळुन आले नाही.आज सकाळी 7:00 वाजता घटनास्थळावरून दीड की.मी.अंतरावर कुंडाजवळील शेतात नागरीकांना मृतदेह दीसुन आला......
2 सप्टेंबर ला रात्री पुर्ण वेळ घटनास्थळावर पातुर तहसीलदार राहुल वानखडे सर,मं.अ.सतीश ढोरे, तलाठी मिलिंद इचे,तलाठी घाटोळ तसेच चानी पोलीस ठाण्याचे ठाणेदार रवींद्र लांडे सर,हे.काॅ.अणील सोळंके, पो.काॅ.अणील करवते, हे.काॅ.वनिता पाटील, पो.काॅ.अमोल भाकरे, महीला पो.काॅ.उज्वला ईटीवाले,हजर होते आणी जि.आ.व्य.अ.संदीप साबळे साहेब वरचेवर संपर्क साधुन होते.अशी माहीती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे
Post Views: 84