विद्युत शाॅक लागलेल्या शेतकरी युवकास दोन कि.मी.चिखलातून काढले बाहेर
अकोला जिल्ह्य़ातील पिंजर येथील शेत शिवारातील घटना
अकोला - आज दिवसभर शेतात वडील व भावा सोबत काम करत असतांना प्रतिक मधुकरराव ठाकरे वय अं.(22) वर्ष विद्युत शाॅक लागुन खाली कोसळल्याची माहीती सुनिल ठाकरे यांनी मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक पिंजर चे प्रमुख दिपक सदाफळे जिवरक्षक यांना माहीती दीली तेव्हा क्षणाचाही विलंब न करत आपल्या रुग्णवाहीकासह जिवरक्षक दिपक सदाफळे हे पाचच मिनिटात पिंजर कारंजा रोडवरील शेताकडे जाणा-या पांदन रस्त्या पर्यंत पोहचले परंतु हा रस्ता अतिशय खराब आणी चिखल असल्यामुळे जाणे शक्य नव्हते रोडवरच रुग्णवाहीका ठेवून सुनिल ठाकरे यांना तात्काळ आपला ट्रॅक्टर आणायला सांगीतला लगेच ट्राॅली नसलेल्या ट्रॅक्टर मुंड्यात बसुन घटनास्थळावर कसेबसे पोहचलो तेव्हा बेशुद्ध अवस्थेत असलेल्या युवकास ट्रेस केले असता कुठलीही हालचाल करताना दीसुन आले नाही पर्याय म्हणून नाही कॅरोटीड पल्स चेक केली ती प्रेझेंट नव्हती तेव्हा लगेच ट्रॅक्टर मुंड्यात घेऊन 2 की.मी.पर्यंत चिखलातून खडतर रस्ता पार करत थेट पिंजर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले डाॅक्टरांनी तपासून पुढील उपचारासाठी अकोला जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी सांगीतले अकोला येथे पोहचाताच डाॅक्टरांनी प्रतिकला मृत घोषित केले. घटनास्थळावरील परीस्थीती अशी झाली होती की हे सर्व पाहुन वडील भाऊ तीनही चुलतभाऊ यांची आरडाओरड आणी त्यांच्या सर्वांच्याच डोळ्यातील न थांबणारे अश्रु कीरंकाळ्या पाहून जिवरक्षक दिपक सदाफळे यांना काय कराव काय नाही सुचेनासे झाले होते हा सिन आताही डोळ्यासमोरून हटायला तयार नाही कारण प्रतिक हा मनमिळाऊ स्वभाव हुशार होता त्याने आता झालेल्या पोलीस भरतीत हिंगोली, अकोला येथे 91% मार्क मिळवून पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून होता. आपला मुलगा पोलीस व्हावा हे स्वप्न बघणारा कष्टकरु प्रामाणिक शेतकरी मधुकर उर्फ बबन ठाकरे यांच्या डोळ्या समोर हे भयानक घटना झाल्याने वडील सुद्धा बेशुद्ध अवस्थेत झाले होते तेव्हा एका गाडीत मुलाचा मृतदेह दुस-या गाडीत बेशुद्ध अवस्थेत वडीलांना अकोला नेत असतांना (सुन्न मन हे निशब्द झाले होते) एकीकडे डाॅक्टर निखील पाटील लहाने यांचे कडे वडीलांना भरती करुन दुसरीकडे मुलाला शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले होते.शवविच्छेदन होईपर्यंत वडील शुद्धीवर येणे हे महत्त्वपूर्ण होते 6:00 वाजता शवविच्छेदन झाले आणी वडील तिकडे शुद्धीवर आल्याने अंत्यसंस्काराचा मार्ग मोकळा झाला होता.ही वार्ता वा-यासारखी पसरताच पिंजर सह परीसरात हळहळ व्यक्त करता शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते कारण प्रतिकचा सर्व युवकांसोबत मनमिळाऊ स्वभाव आणी वडील हे गावातील कार्य क्रमात सहभाग घेऊन श्रम करण्याचा स्वभावाने ते सर्वांच्या सोबत जुडुन आहेत.आज दिवस भर ही परीस्थीती हातळताना अशी वेळ कुणालाच नियतीने दाखवुनये हे शब्द हृदयात पकडून होते.आज दीवसभर अक्षय पाटील लहाने,प्रमोद पाटील रोकडे,ओम पाटील वानखडे,परीमल पाटील लहाने,चंद्रशेखर पाटील ठाकरे,हे सोबत होते आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे स्वयंसेवक मयुर सळेदार,सागर आटेकर, ऋषिकेश तायडे,परीवारासह नातेवाईक अकोला येथे सोबत होते अशी माहीती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे.
Post Views: 144