पत्रकारांवरील हल्ल्यांविरोधात महाराष्ट्रभर आंदोलनांचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ईशारा


परभणी येथील पत्रकार प्रमोद अंभोरे प्राणघातक हल्ल्याती आरोपींवर अ‍ॅट्रोसिटी व पत्रकार संरक्षण कायद्या
 विश्वप्रभात  08 Oct 2024, 10:25 AM
   

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हाधिकायांमार्फत गृहमंत्र्यांना निवेदन
अकोला : अकोला जिल्ह्यात पत्रकारांवर हल्ल्यांची मालिका सुरु असतांनाच परभणी येथील लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हा सचिव प्रमोद अशोकराव अंभोरे यांच्यावर जातीय द्वेषातून प्राणघातक हल्ला करणाNयांवर पत्रकार संरक्षण कायदा व अ‍ॅट्रोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी तसेच पत्रकारांवरील हल्ले थांबले नाही तर महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्याचा ईशारा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख यांनी दिला आहे.
यापुर्वी पत्रकारांवर प्राणघातक हल्ला झाला असतांना, महाराष्ट्रभर या घटनेचे प्रतिसाद उमटल्यानंतर देखिल गुन्हेगारावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही व थातूर मातूर गुन्ह्याची नोंद झाली. ३० सप्टेंबर २०२४ रोजी पातुर तालुक्यातील आलेगांवचे रहिवाशी असलेले पत्रकार सचिन मुर्तडकर यांच्यावर विवरा येथे  प्राणघातक हल्ला करण्यात आला तो अद्यापही खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. परंतू आरोपी मोकाटच फिरत आहेत. सचिन मुर्तडकर तसेच परभणी येथील प्रमोद अंभोरे यांच्यावरील हल्ले हे  जातीय द्वेषातून झालेले आहेत. हे महाराष्ट्रभरात वाढत्या गुन्हेगारीची लक्षणे आहेत. पोलीसांचा वचक संपल्याने पत्रकारांवर हल्ल्यांमध्ये वाढ होत आहे. समाजातील चुकीच्या गोष्टी उघडकीस आणण्याचे काम करणाऱ्या पत्रकारांवर असे हल्ले होत असतील तर हा लोकशाहीचा चौथा स्तंभ ढासळल्याशिवाय राहणार नाही. कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा झाल्याचे  दिसून येत आहे. पत्रकारांवर होणाऱ्या प्राणघातक हल्ल्याची महाराष्ट्रभरात तातडीने चौकशी करावी, तसेच गुन्हेगारांवर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्ह्याची नोंद होऊन त्यांचेवर दखलपात्र गुन्ह्याची म्हणून नोंदी व्हाव्यात. हल्ला झालेल्या पत्रकारांना त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे.या मागणीसाठी आज लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर यांचे नेतृत्वात निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र पाटील यांना दिलेल्या निवेदनावर विभागीय संघटक संतोष धरमकर, साहित्यिक अर्जून घुगे, संघपाल शिरसाट, संतोष मोरे, प्रकाश जंजाळ, योगेश सिरसाट, अजय विजय वानखडे, अनुराग अभंग,  गणेश सोनोने, विजय देशमुख, संजय निकस पाटील, दिपक तु. शिरसाट, डॉ. अशोक शिरसाट यांच्या सह्या आहेत.

    Post Views:  16


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व