उत्तर महाराष्ट्र, विदर्भात थंडी वाढणार


 संजय देशमुख  28 Jan 2022, 8:19 PM
   

मुंबई : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील वातावरणात अचानक बदल झाला असून, पुढील दोन दिवसात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही जिल्ह्यांमध्ये थंडीचा पारा घसरून 10 अंशांच्या पेक्षाही खाली गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने आज पुन्हा एकदा राज्यात थंडीचा तीव्र प्रभाव असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये आज राज्यातील पुणे आणि आसपासच्या परिसरात जमिनी लगतचे वारे पूर्व दिशेने वाहत असून, ते उत्तरेकडून वळून राज्यात येत आहेत. त्यामुळे या परिसरात थंड व कोरडे वारे वाहण्याची शक्यता आहे. या वार्‍याची तीव्रता अधिक असल्याने राज्यातील विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत या वार्‍याचा प्रभाव अधिक असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे वातावरणातील गारठा वाढणार आहे.

Connection failed: Operation not permitted