अकोला : स्थानिक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, लहान उमरी येथे आयोजित सावित्रीची लेक गौरव पुस्कार वितरण सोहळ्यात प्रा. डॉ. संतोष हुशे, डॉ. संजय निकस लिखित महात्मा पुस्तकाचे थाटात प्रकाशन करण्यात आले. महात्मा जोतीरावजी फुले व सावित्रीआई फुले यांच्या जीवन कार्याचा आढावा घेणारे हे पुस्तक सर्व वाचकांना, व अभ्यासकांना उपयोगी ठरेल, असा आशावाद यावेळी सर्व मान्यवरांनी व्यक्त केला.
राज्यस्तरिय ओबीसी नेते तथा शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. संतोष हुशे व डॉ. संजय निकस यांनी लिहलेल्या महात्मा या पुस्तकाचे विमोचन प्रसंगी मंचकावर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा संगिताई आढाऊ, माजी महापौर अर्चनाताई मसने, मीनाताई कवडे, शोभाताई कल्याणकर, संगिता जोध, संध्या हिवराळे, कल्पना मसने, शुभांगी काळे, रेणुकाताई सिरस्कार, रेखाताई मुळतकर, कुंदाताई लोखंडे, उपस्थित होत्या.
यावेळी सर्वप्रथम सावित्रीआई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी कार्यक्रमाला माजी आमदार तुकाराम बिडकर, माजी आमदार बळीराम सिरस्कार, ओबीसी नेते प्रा. डॉ. संतोष हुशे, अरुन काळे, माजी नगरसेवक जयंत मसने, उमेश मसने, मनीष हिवराळे, अरविंद घाटोळ, प्रमोद ढोमणे, सदाशिव शेळके, अनिल शिंदे, पंजाबराव वर, संतोष धरमकर, डॉ. संजय निकस, प्रदीप काळे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुयेशा हाडोळे, शारदा धानोकार, तर आभारप्रदर्शन ज्योती निखाडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मायाताई ईरतकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. स्नेहलता नंदरधने, दीपमाला खाडे, संगीता निखाडे, मीरा मसने, संध्या देशकर, नेहा राऊत यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 168
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay