उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतील उपशहर प्रमुखाची हत्या पूर्व वैमानस्यातूनच


दोन तासात छडा लावून दोन आरोपींना पोलिसांनी केली अटक
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  31 Oct 2022, 2:27 PM
   

काल सायंकाळच्या सुमारास उद्धव गटाच्या शिवसेनेचे अकोला उपशहर प्रमुखाची भर चौकात धारधार शस्त्राने हत्या केल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली भर चौकात झालेल्या या हत्येने प्रकरणी पोलिसांनी दोन तासाच्या आतच दोन आरोपींना अटक करण्यात यश आले आहे...

अकोला जिल्ह्यात गेल्या सात दिवसांपासून खुनांच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. एकामागोमाग घडलेल्या तीन हत्यानी शहर हादरले आहे. काल सायंकाळच्या सुमारस अकोल्यातील रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील जठारपेठ चौकात भर सायंकाळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतील उपशहर प्रमुख विशाल रमेश कपले यांच्यावर दोन अज्ञात लोकांनी चाकू हल्ला केला या घटनेनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विशालला परिसरातील नागरिकांनी तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी विशाल कपले यास मृतक घोषित केले. या आरोपीनी विशालवर लगातार सात वार केल्याने विशालचा घटनास्थळीच मृत्यू झाला ही हत्या करणाऱ्यांमध्ये दोन जणांचा समावेश असून हे दोघेही मोठी उमरी परिसरातील रहिवासी असल्याचं रामदास पेठ पोलिसांना समजताच रामदास पेठ पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांनी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षका मोनिका राऊत अकोला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक आरोपींना पकडण्या करिता रवाना केले असता या पथकाने या हत्येतील दोन आरोपींना दोन तासाच्या आत कारंजा येथून अटक केली. सदर हत्ये प्रकरणी वविध तर्क वितर्क लावले जात असतांनाच 10 दिवसा पूर्वी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी आरोपी 23 वर्षीय शिवानंद मनोहर दोरवेकर व 22 वर्षीय विनोद रमेश कांबळे दोघेही राहणार महाकाली मंदिर मोठी उमरी यांनी ही हत्या केल्याची कबुली दिली... ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षका मोनिका राऊत अकोला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली रामदास पेठ पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांच्या नेतृत्वात अकोट फाईल पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशिर,पोलीस कर्मचारी संदीप ताराळे, छोटू पवार, प्रशांत इंगळे यांनी केली. अवघ्या दोन तासात या हत्येतील आरोपींना अटक केल्याने सर्वत्र पोलिसांचे कौतुक होत आहे.

    Post Views:  191


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व