पाम ग्रामपंचायत पुन्हा वादाच्या भोवऱ्यात....
पालघर!कोकण आयुक्ताच्या आदेशाला ग्रामपंचायत पाम ने केराची टोपली दाखविल्याने पुन्हा एकदा पाम ग्रामपंचायत वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
तातडीची सभा बेकायदेशीर घेणे , ग्रामपंचायतीच्या मुळ दस्तऐवजामधे खाडाखोड करणे , अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी शासनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब न करणे, जागेची मोजणी करू नये म्हणून उप अधीक्षक भूमी अभिलेख यांना पत्र देणे हा प्रकरण पाम ग्रामपंचायतीच्या तात्कालीन सरपंच सह संपूर्ण ग्रामपंचायतीला चांगलाच महागात पडलेला असताना पुन्हा एकदा त्याच मालमत्तेवर निष्कासनाची कारवाई करण्यासाठी पाम ग्रामपंचायतीकडून हालचाली केली जात आहे.
मुंबई बोरीवली येथे राहणाऱ्या पाम गावातील ग्रामस्थ चिंतामण हिराजी पाटील यांची वडिलोपार्जित मिळकत स.न.गा.प २४/२, क्षेत्र ०.०७.१० हे आर या भूखंडावर डिसेंबर २०१८ रोजी बांधकाम केलेली संरक्षण भिंत दिनांक ७ ऑक्टोबर २०२१ रोजी बेकायदेशीर व मनमानीपणे तोडून २,२०,००० रूपयांची जंगम मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी सरपंचावर व ग्रामसेवकावर कारवाई होणे बाबत संबंधित विभागाकडे अर्जदार चिंतामण हिराजी पाटील यांनी तक्रार दाखल केली होती.
तक्रारीच्या अनुषंगाने गटविकास अधिकारी पालघर, जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी सादर केलेला अहवाल तसेच सदर प्रकरणी निर्णय घेण्यापूर्वी संबंधितांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी व्हिडिओ प्रणालीद्वारे सुनावणी घेण्यात आली होती. सदर सुनावणीत अर्जदार, गैरअर्जदार यांनी आपले म्हणणे मांडल्यानंतर प्रस्तुत प्रकरणात तात्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायतीच्या मूळ दस्तऐवजांमध्ये खडाखोड करून फेरफार केलेल्या बेकायदेशीर कृत्यांबाबत ग्रामविकास विभागातील शासन शुद्धीपत्रक क्र.व्हीपीएम-२०१९/प्रक्र.२८१/पंरा-३, दिनांक १८ सप्टेंबर २०१९ नुसार तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांचे विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच विवादित जागेची मालकी सिद्ध होऊ नये म्हणून उपाधीक्षक भूमी अभिलेख पालघर यांना जागेची मोजणी करू नये असे पत्र देणे, अतिक्रमण निष्कासित करण्याकरिता शासनाच्या कार्यपद्धतीचे अवलंब न करणे, अतिक्रमण निष्कासित करण्याचा ठराव बाबत ग्रामसभेच्या अजेंठ्यामधे खाडाखोड करणे.या सर्व बाबींबाबत गैरअर्जदार यांचे हेतू अप्रामाणिकपणे असल्याचे स्पष्ट होत असल्याचे कोकण विभागीय आयुक्त यांनी आदेश देत, ग्रामपंचायत पाम यांनी विवादित जागेची सक्षम प्राधिकरणाकडून मोजणी करून घ्यावी मोजणी नंतर सदर मिळकत अर्जदार यांच्या मालकीची निघाल्यास अर्जदाराच्या झालेल्या नुकसान भरपाई बाबतची जबाबदारी तात्कालीन सरपंच व संबंधित ग्रामसेवक यांच्यावर निश्चित करण्यात यावी असे आदेश कोकण विभागीय आयुक्त यांनी दिलेले असताना सदर जागेची मोजणी न करता ती जमीन नेमकी कुणाची आहे हे तपासून न पाहता कोकण आयुक्तांच्या आदेशाला न जुमानता पुन्हा एकदा त्याच भूखंडावर तोडक कारवाई करून ग्रामपंचायतीचा पैसा खर्च करत सरपंच व ग्रामसेवक यांना अडचणीत आण्याचा डाव असल्याचे अर्जदार चिंतामण पाटील यांनी सांगितले आहे.
ग्रामसेवकांची प्रतिक्रिया
सदर भूखंड मोजणी करीता उप अधीक्षक भूमी अभिलेख यांना पत्र देण्यात आले आहे परंतु सदर भूखंड मालकी पुरावा पंचायतीकडे नसल्याने मोजणी करण्यास अडथळा निर्माण होत आहे : अरविंद संखे - ग्रामसेवक पाम
Post Views: 284