दौंड- जामखेड रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे अपघातांना निमंत्रण..!


 विश्वप्रभात  09 Oct 2024, 8:14 AM
   

श्रीगोंदा - दौंड जामखेड रोडवरील कामे अपूर्ण असल्याने रात्रीच्या  काळाकुट्ट अंधारात वाहतुकीला अडथळे निर्माण झाले असून ही परिस्थिती जबर अपघातांना निमंत्रित देणारी ठरली आहे. उखडलेल्या रस्त्याने चार चाकी गाड्या पलटी होण्याचा संभव आहे.भरधाव येणाऱ्या गाड्यांना पुढे सुरू असलेले काम लवकर दिसत नाही. त्यामुळे पलटी होऊन गाड्यांचे अपघात होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. त्यासाठी संबंधितांनी सुचनाफलक आणि लाल दिवे लावणे आवश्यक आहे. याबाबत प्राधान्याने लक्ष देऊन सावधगीरीच्या उपाययोजना कराव्यात अशी  आढळगाव युवक आणि प्रवाशांची मागणी आहे. या रस्त्यांच्या बांधकामात योग्य ती दक्षता घेण्याचे गांभिर्य लक्षात घेतले नाही तर अनेक  लोकांच्या जीविताला धोका संभवू शकतो. याला जबाबदर कोण  राहणार? रस्ते हे दळणवळणासाठी आहेत की लोकांचे प्राण घेण्यासाठी यांचे उत्तर संबंधितांनी द्यावे.व दक्षतेच्या उपाययोजना कराव्यात.  अन्यथा गावकऱ्यांच्या वतीने आंदोलन केले जाईल असा  इशारा मनसे अध्यक्ष वैभव हराळ यांनी दिला आहे मनसे  सचिव संजय शेळके यांनी देखील पाहणी केली असून हा रस्ता धोकादायक असल्याचे म्हटले आहे.त्यामुळे प्रवाशी आणि नागरीकांच्या मागणीचा विचार न झाल्यास लवकरात लवकर आंदोलनाला सुरूवात केली जाईल असे वैभव हराळ यांनी म्हटले आहे.

    Post Views:  22


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व