उषाताई घुगे राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत पंजाबराव वर यांच्या कवितेला राज्यस्तरीय पुरस्कार
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
28 Sep 2024, 9:48 AM
अकोला : अंकुर साहित्य संघ, स्व. उषाताई घुगे बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय काव्यस्पर्धेमध्ये साहित्यिक, कवी साप्ता. नारी ललकारचे संपादक पंजाबराव वर यांंची शहीत पत्नीची व्यथा कथन करणारी ‘कुंकू बलीदानाचं’ या कवितेला राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार खुशाल गुल्हाणे (अमरावती), द्वितीय चंद्रशेखर धर्माधिकारी (पुणे), तृतीय पुरस्कार गोपाल तुमसे (कारंजा लाड) तर उत्तेजनार्थ पुरस्कार कल्याणी मादेशवार, वासुदेव खोपडे, नारायण अंधारे, महेन्द्र ताजणे यांना स्मृतिचिन्ह, प्रमाण पत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ कवी नारायण अंधारे व सहभागी ़कवी हिम्मत ढाळे, तुळशीरामजी बोबडे, डॉ. अशोक सिरसाट, प्रा मोहन काळे, महेंद्र ताजणे, शिवलिंग काटेकर, अॅड. प्रज्ञानंद उपर्वट, गजानन छबीले, गोदावरी कलोरे, अशोक शेगोकार, डॉ. मनोहर घुगे, साहित्यिक अर्जून घुगे, पंजाबराव वर यांनी दर्जेदार कविता सादर केल्या. संचालन ़कविराज धिरज चावरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा सदाशिव शेळके यांनी मानले.
Post Views: 102