अकोला : खडकी विभागातील साईनाथ कॉलनी येथील गुंजन नाना बोरकर या विद्यार्थीनीने अगदी प्रतिकुल परिस्थितीमध्ये १० वी मध्ये ९५ टक्के गुण मिळवून मेरीट येण्याचा मान मिळविला. तिच्या घवघवीत यशामुळे कॉलनीवासीयांनी तसेच वर्हाड विकास संस्थेचे अध्यक्ष तथा पत्रकार पंजाबराव वर व सौ. सुनंदा पंजाबराव वर यांनी सूचित प्रकाशनचे पुस्तकाचा संच व पेन तसेच साईनाथ कॉलनीवासीयांनी गुंजन बोरकरचा तसेच तिच्या यशामध्ये कमालीचा वाटा असलेली गुंजनची आई सौ. संजना बोरकर व नाना बोरकर यांना तसेच आजी आजोबा बळीराम बोरकर, ताराबाई बोरकर, मोठी आई प्रमिला बोरकर व मोठे बाबा अशोक बोरकर, पियुष नाना बोरकर यांचाही पुष्पगुच्छ देवून यथोचित सन्मान केला. गुंजनच्या आई वडीलांची आर्थिक परिस्थिती अगदी बेताची असून ती नोव्हेल कॉन्व्होंटची विद्यार्थीनी आहे, विद्यालयातून ती द्वितीय आली आहे. तिला कुठलीही शिकवणी नव्हती. तिच्या आईचे दोन वर्षापुर्वी कॅन्सरचे ऑपरेशन झाले असतांनाही तिने मुलीसाठी खूप मेहनत घेतली आहे. या गुणवान मुलीचा तिला खूप अभिमान आहे. तिच्या परिक्षेच्या दरम्यान वडील पाच महिने एस.टी.संपामध्ये असल्याने कसे बसे ़कुटूंबाचा चरीतार्थ चालवित होते. हलाकीच्या परिस्थितीमध्ये गुंजनने अभ्यास करून हे यश संपादान केले आहे. तिला खूप मेहनत करून शास्त्रज्ञ होवून देशाची सेवा करायची असल्याचे सत्काराम दरम्यान तिने मनोगत व्यक्त केले. सदरहू कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी से.नि. सी.ई.ओ चंद्रकांत इंगळे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये अनिल देशमुख, सुरेंद्र देशमुख, गोपाल देशमुख, आरोग्य विभागाच्या सुमनताई सोनोने, शिलाताई देशमुख, सोनाली सम्रुतकर, प्रणिता राजेश समृतकर, उषा समृतकर, लक्ष्मीताई वानखडे, एम.बी. चौबे, अॅड. अतूल पी. गवई, आशाताई देशमुख, शितल देशमुख, शृतिका देशमुख, श्रीमती गाडेताई, निर्मला लक्ष्मण राऊत, उज्वला ज. शेगोकार, धुळे साहेब, ज्ञानेश्वरी अमोल महल्ले, अनिता कुकडे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन पंजाबराव वर यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल देशमुख यांनी मानले.
Post Views: 209