कुटासा : पोलिस स्टेशन दहीहांडा हद्दीतील गांधी स्मारक रेल्वेस्टेशन जवळ शेत शिवारात बेकायदा वाळू उपसा करून चोरटी वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांना दहीहंडा पोलिसांनीं मोठा दणका दिला आहे.चोरुन वाळू किंमत 6000 रुपये व वाहतूक करणारी वाहन क्र. टाटा ४०७ MH.30.AB.2938 किंमत 4 लाख रुपये व एक मोबाईल किंमत 700 रुपये.असा एकूण चार लाख सहा हजार सातशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अशी माहिती पोलिसांनी दिली.यामध्ये हरिश्चंद्र कांबे वय 30 वर्ष किनखेड यास अटक केले असून प्रदीप चांडक हा फरार आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती नुसार दहीहांडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाळू उपसा करून तो रात्रीच्या सुमारास वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक कारवाईसाठी तैनात करण्यात आले.या पथकाने पोलिस स्टेशन दहीहांडा हद्दीतील गांधी स्मारक रेल्वे स्टेशन जवळ शेत शिवारात चोरीच्या वाळूने भरलेले ट्रक सापळा रचून पकडला. असुन तो ट्रक जप्त करण्यात आला.आरोपी विरुद्ध विविध गुन्हे दाखल करुन अटक करण्यात आली आहे.यावेळी पोलीसांनी चार लाख सहा हजार सातशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदर आरोपी विरोधात 379,34 भा.द.वी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आली आहे.सदरची कारवाई ठाणेदार सुरेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहांडा पोलीसांनी केली आहे .
Post Views: 375
सर्व
सर्व