पाटील समाज अकोला तर्फे वधू -वर परिचय मेळावा प्रचंड उपस्थितीत संपन्न
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
14 Nov 2022, 5:02 PM
अकोला - पाटील समाज अकोला तर्फे स्थानिक जानोरकर मंगल कार्यालयात उपवर वधू-वर परिचय मेळावा प्रचंड उपस्थितीत संपन्न झाला. या मेळाव्यात 512 मुला मुलींची नोंदणी करण्यात आली. तर 96 मुला मुलींनी व्यासपीठावर आपला परिचय सादर केला. मेळाव्या करीता मुलामुलींसह त्यांच्या पालकांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पाटील समाजाचे उपाध्यक्ष रघुनाथराव खडसे तर प्रमुख अतिथी म्हणून ह.भ.प. तुकाराम महाराज सखारामपूरकर इलोरा व ह.भ.प. गोपाळ महाराज उरळ हे उपस्थित होते. अतिथी म्हणून ह.भ.प. संतोष महाराज कारंजा रमझानपुर, ह.भ.प. महादेव महाराज पाळोदी, मराठा महासंघाचे विभागीय अध्यक्ष कृष्णा अंधारे, जि.प.चे माजी सभापती चंदशेखर पांडे, सामाजिक कार्यकर्ते तथा राज्य प्रवक्ते डॉ.सुधीर ढोणे, दत्त नागरी सहकारी पत संस्थेचे अध्यक्ष जगदीश मुरूमकर, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अशोक पटोकार, शेतकरी संघटनेचे नेते मनोज तायडे, महानगर पालिकेचे माजी उपमहापौर तथा नगरसेवक विनोद मापारी, नगरसेविका योगीताताई पावसाळे, पाटील समाज महिला आघाडीच्या अध्यक्षा ज्योत्स्नाताई चोरे, उपाध्यक्षा सुषमाताई निचळ, सचिव सुनीताताई मेटांगे उपस्थित होते.
प्रारंभी अतिथींच्या हस्ते राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन व दिप प्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. पाटील समाजाचे उपाध्यक्ष विनायकराव शेळके, सचिव दिनकरराव सरप, कोषाध्यक्ष राजेन्द मोहोकार, प्रसिध्दी प्रमुख प्रदीप खाडे, सुनील जानोरकर, संतोष कुटे, सुरेश गाढे पाटील, रवि साखरे, विजय बोरकर, संदीप महल्ले, देविदास नेमाडे, गोपाल दांदळे, वैष्णवी अंधारे यांनी अतिथींचे स्वागत केले.
अविनाश पाटील नाकट यांनी जिजाऊ वंदना सादर केली. याच कार्यक्रमात डॉ.गुंजन राजेन्द्र मोहोकार यांना एम.डी.मेडीसीनला प्रवेश मिळाल्याबद्दल तर कु. दिपाली श्रीकांत बोरोकार यांची रिझर्व बँक ऑफ इंडीया मध्ये प्रथम श्रेणी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्या बद्दल त्यांचा अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच समाजाच्या मेळाव्यासाठी जानोरकर मंगल कार्यालय विनामुल्य उपलब्ध करून देत असल्याबद्दल विकम जानोरकर यांचाही अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी तुकाराम महाराज सखारामपूरकर, गोपाल महाराज, डॉ.सुधीर ढोणे, रघुनाथराव खडसे यांनी प्रबोधनपर भाषणे झालीत. मेळाव्याचे प्रास्ताविक रामेश्वर सपकाळ यांनी, संचालन प्रदीप खाडे यांनी तर आभार प्रदर्शन सुनील जानोरकर यांनी केले. योगायोग पुस्तीकेकरीता मुलामुलींची नोंदणी 25 नोव्हेंबर 2022 पर्यंत पूर्वी जाहीर केलेल्या ठिकाणी करता येईल असे या प्रसंगी योगायोगचे संपादक प्रदीप खाडे यांनी जाहीर केले.
मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी पाटील समाज अकोलाचे अध्यक्ष अशोकराव अमानकर यांचे मार्गदर्शनाखाली विनायकराव शेळके, दिनकाराव सरप, राजेन्द्र मोहोकार, प्रदीप खाडे, गुणवंतराव जानोरकर, रघुनाथराव शेळके, सुनील जानोरकर, वासुदेवराव कडु, निवृत्ती पारसकर, संदिप महल्ले, अविनाश नाकट, अविनाश पाटील, प्रा.दत्तात्रय भाकरे, गजानन डीवरे, देवानंद वसु, शैलेश काळे, प्रदीप चोरे, माणिकराव गावंडे, विनायकराव गावंडे, दयाराम मेतकर, सागर अमानकर, निलेश पवित्रकार, हर्षल भांबेरे, सुरेश पागृत, मधुकरराव सरप, ज्ञानदेव वनारे, दिलीप मानकर, योगेश थोरात, वारूळकर गुरूजी, योगेश सरप, गजानन भगत, अशोक ढोले, सुधाकर वानखडे व इतरही कार्यकत्यांनी परिचय घेतले.
Post Views: 284