*ओबीसी धरणे आंदोलन पूर्वतयारीसाठी परभणीत सभा*


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  23 Mar 2022, 9:03 AM
   

परभणी- आझाद मैदान मुंबई येथे ओबीसी हक्क परिषद दिल्ली च्या वतीने एक दिवशीय धरणे आंदोलन ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी आयोजित करण्यात आले . या धरणे आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी परभणी येथे हॉटेल श्री मध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ओबीसी हक्क परिषद दिल्ली चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री प्रदीप बाबुराव फाले हे होते.त्यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या  या बैठकीचे आयोजन ओबीसी समाजाचे नेते तथा प्रदेश कार्याध्यक्ष श्री सुभाष पांचाळ यांनी केले होते. या बैठकीसाठी ,श्री भगीरथ बदर प्रदेश सचिव, श्री प्राध्यापक अमोल गौतम प्रदेश उपाध्यक्ष, श्री प्रल्हादराव सावंत विभागीय उपाध्यक्ष ,श्रीमती मीनाक्षी पावटे परभणी जिल्हा महिला कार्याध्यक्ष, श्रीमती शिवकांता व्यवहारे, मराठवाडा महिला उपाध्यक्ष, विविध ओबीसी हक्क परिषदेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री प्रदीप फाले  यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना बारा एप्रिल रोजी मुंबई येथे होणाऱ्या धरणे आंदोलनासाठी हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान केले. यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.  त्यांना नियुक्तीचे पत्र ओबीसी हक्क परिषदेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष श्री प्रदीप बाबुराव फाले यांच्या शुभ हस्ते देण्यात आले. यानंतर श्री सुभाष पांचाळ यांनी सर्वांचे आभार मानले.

    Post Views:  383


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व