लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ व रुग्णहक्क संरक्षण समिती व समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या वतीने गरजू रुग्णास रक्तदान
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
19 Nov 2024, 11:01 PM
परभणी - संपूर्ण महाराष्ट्र भर पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणारी तसेस सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारी संघटना लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ व रुग्णांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणारी रुग्ण हक्क संरक्षण समिती व समाजहितासाठी सामाजिक कार्य करणारी सामाजिक संस्था समाजहित अभियान प्रतिष्ठान च्या वतीने समाजहित अभियान प्रतिष्ठानचे सभासद सामाजिक कार्यकर्त विजय पवार यांनी परभणी शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाचे उपचार घेत असलेल्या एका गरजू रुग्णास मेट्रो ब्लड बँक येथे रक्तदान करून रक्त उपलब्ध करून दिलें आहे.
रक्तदान केल्यामुळे रक्तदाते विजय पवार यांचा सर्वच सामाजिक संघटनेच्या वतीने पुष्पहार घालून सत्कार करून आभार मानले. यावेळी रुग्णास रक्त उपलब्ध करून देण्यासाठी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे परभणी मुस्लिम विकास परिषद जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज वंचित बहुजन आघाडीचे परभणी तालुका अध्यक्ष तथा लोक स्वतंत्र्य पत्रकार महासंघ परभणी जिल्हा कार्याध्यक्ष तथा समाजहित अभियान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद अशोकराव अंभोरे, तालुका उपाध्यक्ष शेख कलीम, रुग्ण हक्क संरक्षण समिती परभणी तालुका अध्यक्ष युनूस कच्ची, भिमाकोरेगाव मित्र मंडळ चे अध्यक्ष संदीप वायवळ आदींनी परिश्रम घेतले. तसेच लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ व रुग्णाहक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते. यावेळी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ, रुग्ण हक्क संरक्षण समिती, समाजहित अभियान प्रतिष्ठान चे पदाधीकारी, रुग्णाचे नातेवाईक व मेट्रो ब्लड बँक कर्मचारी उपस्थित होते.
Post Views: 8