दम्माणी नेत्र रूग्णालयाच्या सभापती शुक्ल यांना भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिन्दू रत्न पुरस्कार...!


 विश्व प्रभात  14 Nov 2024, 8:42 PM
   

अकोला - अकोला येथील धम्माची नेत्र रूग्णालयाचे मुख्य व्यवस्थापक  सभापती गिरीजा शंकर शुक्ला यांना मनीभाई देसाई मानव सेवा ट्रस्टचा  यंदाचा  भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल “हिंदुरत्न " पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.या प्राप्त बहूमानाबध्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
       नीति आयोग संलग्नित व आय एस.ओ नामांकन प्राप्त पद्मश्री डॉ.मनीभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट, क्रीडा मंत्रालय भारत सरकार, यांचेकडून व डॉ.रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्राच्या वतीने २०२४ चा हा पुरस्कार देण्यात आला‌. सभापती  गिरीजाशंकर शुक्ला हे जहांगाई उत्तर प्रदेश येथील रहिवाशी असून मुंबईतील दम्माणी ग्रूप आणि अनेक सामाजिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत. पुणे मुंबई या ठिकाणी उच्च शिक्षण घेऊन अकोला येथे दम्माणी नेत्र रूग्णालयाचे मुख्य व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.या माध्यमातून त्यांचे अकोला जिल्हा आणि विदर्भामध्ये रूग्णालय आणि मोतीबिंदू शिबीरांच्या माध्यमातून दृष्टीदानाचे फार मोठे कार्य सुरू आहे.या उपक्रमातून त्यांनी आतापर्यंत ५० हजार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा विक्रम प्रस्थापित केलेला आहे.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ आणि अनेक सामाजिक संस्था सुध्दा त्यांच्या उपक्रमात सहभागी होऊन अनेक शिबीरांची आयोजने करीत असतात‌‌.आपल्यावर  समाजाचं काही तरी ऋण असल्याच्या भावनेतून ही सेवाभावी वृत्ती ते जोपासत आहेत.या व्यतिरिक्त  अनेक कंपनी व संस्थांवर पदाधिकारी म्हणून त्यांनी  कार्य केलेले आहे. त्यांनी रोटरी क्लबचे अध्यक्षपद सुद्धा भूषविले असून सामाजिक बांधिलकी जपत आपल्या लेखणीतून पुस्तकाची निर्मिती केलेली आहे.त्यांच्या सर्वांगीण  सामाजिक व धार्मिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार बहाल करून सन्मानित करण्यात आलेले आहे.
       सदर पुरस्कार सोहळा   दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४  रोजी सायंकाळी सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन टिंबर मार्केट,नवी पेठ,पुणे येथे संपन्न झाला. या प्राप्त बहुमानाबध्दल त्यांचे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख , पत्रकार महासंघाचे सर्व पदाधिकारी व मोतीबिंदू व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अकोला जिल्ह्यातील असंख्य सामाजिक कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

    Post Views:  297


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व