होली फेथ इंग्लिश प्राइमरी स्कूल हिवरखेड मध्ये सावित्रीबाई फुले जयंतीच्या औचित्य साधून टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू व विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  07 Jan 2025, 12:29 PM
   

(मनोज भगत) - हिवरखेड : होली फेथ इंग्लिश प्रायमरी स्कूल मध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी व सोबतच टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू आणि विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमा प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तेल्हारा पंचायत समितीच्या माजी उपसभापती सौ . प्रतिभाताई सतीश इंगळे तसेच विज्ञान प्रदर्शनी निरीक्षक म्हणून लाभलेले सौ विद्याताई संतोषकुमार राऊत मॅडम व संजीवनीताई प्रशांत इंगळे मॅडम ह्या होत्या प्रमुख अतिथी म्हणून हीवरखेड पोलीस स्टेशन मधून दामिनी पथकाच्या  हेड कॉन्स्टेबल सुनिता डाहे मॅडम होत्या तसेच प्रमुख अतिथी म्हणून जगन्नाथभाऊ महाकाळ ,सतीश दादा  इंगळे, गावचे पोलीस पाटील प्रकाशजी गावंडे ,डॉ. रामदास धुळे, डॉ .इंगळे, अरुणजी राहणे उपस्थित होते. टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू बनविणे व विज्ञान प्रदर्शनी करिता विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका कल्पना अस्वार मॅडम  यांनी केले. संचालन प्रज्ञा गवई मॅडम नी केले तर आभार  प्रदर्शन वालचाळे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी रहाटे मॅडम , शेळके मॅडम,कुऱ्हाडे मॅडम , अग्रवाल मॅडम , सोनोने  मॅडम,मानकर मॅडम, ढेगेकर ताई , वायकरताई तसेच राजाराम भाऊ इंगळे आदींनी परिश्रम घेतले.

    Post Views:  62


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व