पानटपऱ्या बनताहेत नशेखोरांचा अड्डा!


सहजतेने मिळताहेत गोळ्या, नसेचे साहित्य; अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  09 Nov 2024, 9:31 AM
   

अकोला : जिल्ह्यातील विविध भागात असलेल्या पानटपरी, पानठेल्यावर एमडी ड्रग्ज, तंबाखू, ई- सिगारेट, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ, ड्रग्ज, नशेचे साहित्य सहजतेने मिळत असल्याने पानटपऱ्या नशेखोरांचा अड्डा बनल्या आहेत. या प्रकाराने नागरिकांचे आरोग्य धोक्यात टाकले जात असून याकडे अन्न व औषध प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे.
नागरिकांना चैनी व तोंडाचे चोचले पुरविणाऱ्या पानटपरी, पानठेले गावोगावी, शहरात वेगवेगळ्या भागात, कानाकोपऱ्यात नजरेस पडतात. या पानटपऱ्या पानठेल्यांवर तरुण, विदयार्थी व नागरिकांना व्यसनाच्या आहारी जाणाऱ्या व प्रत्येक घराघरात चोर पाऊलानी शिरकाव करणाऱ्या पुड्या, पान, सुगंधी सुपारी, ओला, सुका मावा यासह अनेक तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जाते. पानठेले, पानटपऱ्या लहान दिसत असले तरी तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीतून मोठी उलाढाल केली जाते. आता तर पानठेले, पानटपऱ्या नशेखोरांचा अड्डा बनल्या असून याठिकाणी एमडी ड्रग्ज, तंबाखू, ई- सिगारेट, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ, ड्रग्ज, नशेचे साहित्य सहजतेने मिळत आहेत. यासोबतच नशा करण्यासाठी कप, सायरप खोकल्याचा औषध कोडी स्टार हे सुद्धा साहजतेने उपलब्ध होत आहेत. झोपेच्या गोळ्यांचा वापर, सेक्ससाठी लागणाऱ्या गोळ्यांची विक्री सुद्धा पाणटपरी, पान ठेल्यांवर केल्या जात आहेत. हा प्रकार चालविण्यासाठी एक साखळी कार्यान्वित करण्यात आली असून ठोक औषधे विक्री ते त्यांचे एमआर, सेल्समन या साखळीत आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या किरकोळ पानठेले, पानटपऱ्यांना एमआर सेल्समन, मिनी होलसेलर यांच्याकडून पुरवठा होत असून
अन्न व औषधी प्रशासन व पोलीस विभागाने संयुक्त मोहीम राबविल्यास मोठे  घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे.

-- जादा दराने विक्री, प्रशासनाने दुर्लक्ष !
एखाद्या गरजू रुग्णाला औषधी, मेडिकलमधून उपलब्ध होऊ न शकणाऱ्या झोपेच्या व नशेच्या गोळ्या पानठेले व पानटपऱ्यांवर सहजपणे उपलब्ध होताना दिसतात. पानटपऱ्या, पानठेल्यांवर तरुण पिढी, नागरिकांना अधिकचे पैसे मोजून नशा करणाऱ्या पदार्थांची विक्री केली जात असल्याने या प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पानटपऱ्या सातत्याने दुर्लक्षित होत असल्याने भविष्यात मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

--- याठिकाणी होतेय नशेच्या गोळ्यांची विक्री !
शहरातील मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे रेल्वेस्टेशन परिसर, गांधी चौक, सर्वोपचार रुग्णालय, कच्ची व पक्की खदान, कौलखेड चौक, सिव्हिल लाईन चौक परिसर, जठारपेठ, अकोट फैल, ताजना पेठ, अकोट स्टँड परिसर, डाबकी रोड, शिवसेना वसाहत, हरिहर पेठ या परिसरात मोठ्या प्रमाणात नशा, सेक्स वाढविणाऱ्या गोळ्या व अमली पदार्थांची विक्री केली जात आहे. याकडे अन्न व औषध प्रशासन लक्ष देईल का? की नेहमीसारखे दुर्लक्ष असेल असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

    Post Views:  212


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व