टोल नाक्यावरील गुंडांचा पत्रकार शंकर जोगी यांच्यावर प्राणघातक हल्ला
व्हाईस ऑफ मिडीया पत्रकार संघाचे पोलीस अधिक्षकांना; पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्य
अकोला : व्हाईस ऑफ मिडीया (सा.विंग)चे विदर्भ अध्यक्ष तसेच फ्लेॅक्सचा व्यवसाय करणारे लघु व्यवसायी शंकर जोगी यांच्यावर बोरगांव मंजू पो.स्टे. हद्दीतील कुरणखेड जवळील टोल नाक्यावरील गुंड प्रवृत्तीच्या मॅनेजर शर्मा व त्यांच्या १० ते १५ टोळक्यांनी संगणमताने प्राणघातक हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याने त्याचे डोळ्याजवळ तीन टाके पडले व हात प्रâक्चर करून गंभीर जखमी केले त्या सर्व गैरअर्जदारावर जिवे मारण्याचा प्रयत्न ३०७ कलमा अंतर्गत तसेच पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्या संदर्भात जिल्हा पोलीस उपअधिक्षक अभय डोंगरे यांना निवेदन दिले. राज्यातील कायदा व सुव्यवस्था कमालीची ढासळली आहे, पोलीसाचा वचक राहिला नाही, राजकीय लोकांच्या हस्तक्षेपामुळे पत्रकार संरक्षण कायद्याला केराची टोपली दाखवली आहे.
शनिवार, दि. १० आगस्ट २०२४ रोजी त्यांच्या चार चाकी गाडीने मुर्तिजापूर येथे ़जाहीरातीचे बॅनर लावून आल्यानंतर संध्या. ५ वाजताचे दरम्यान अकोल्याला परत येताना काटेपूर्णा येथील टोल नाका वसुलीसाठी गाडी थांबल्यानंतर त्यांना केंद्रीय रोड व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या आदेशानुसार ६० कि.मी.च्या आत कोणताही टोल नाका शुल्क लागणार नाही असे सांगीतले, याबाबत जोगी यांनी आधार कार्ड दाखवून गाडी सोडण्यात येईल व नेहमी ये जा करण्यासाठी पास बनवून घेता येईल याबाबतच व्हिडिओ व आदेश दाखवल्यानंतर व पास बनवून देण्याची विनंता केली असता अशा प्रकारचा कोणताही जीआर नाही असे म्हणून शर्मा व त्यांचे साथीदार म्हणाले की, तुमच्या बापाचा नाका किंवा रोड नाही, व आम्ही पत्रकाराला झ्याट समजतो अश्लील शिवीगाळ करीत मॅनेजर शर्मा यांच्या चिथावणीवरून १० ते १५ कर्मचाNयांनी भ्याड ाqजवघेणा हल्ला केला. यावेळी त्यांचे सोबत कामावरील मजूर सचिन वासुदेव हिरोळे, अमोल वासुदेव हिरोळे, राजू अर्जून इंगळे, सुरज इंगळे हजर होते. त्यांनी व प्रवाशांनी मध्यस्थीमुळे मोठी दुर्घटना टळली. अन्यथा शंकर जोगी यांचा ते जीव घेणार होते. मोठा रक्तस्त्राव झाल्याने व डावा हात प्रॅâक्चर झाल्याने डोक्याला तीन टाके पडले आहे. शंकर जोगी यांनी पोलीस स्टेशन बोगांव मंजू येथे शनिवार दि. १०/०८/२०२४ रोजी दिली असता, पोलीसांनी दि. १३/०८/२०२४ रोजी अप. क्र. ३७४/२०२४ कलम ११७ (२), ११५ (२), ३५२ (३) (५) एन.एस. नुसार गुन्हे दाखल केले. घटना शनिवार दि. १० ऑगस्ट घडलेली असतांना पोलीसांनी १३ ला एफ.आय. आर. दाखल केला आहे व आरोपीला अटक न करता आरोपी खुलेआम मोकाट फिरत आहेत.
यापूर्वी देखिल अशाच प्रकारे प्रवाशांकडून तसेच पत्रकारांकडून अवैधरित्या टोल वसूल करण्याचा गोरकधंदा सुरू असल्याने प्रवाशांची लूट थांबवावी. होत असल्याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यम व सोशियल मीडियावर व्हायरल केल्याबाबतचा वचपा काढण्यासाठी हा भ्याड हल्ला करण्यात आला आहे.याबाबतची तक्रार रोड व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सकल पत्रकार संघटनेच्या वतीने व विविध सामाजिक राजकीय पक्षाच्या वतीने करण्यात येणार आहे. टोल नाक्यावरील शर्मा नामक व्यक्तीसह व त्यांच्या १० ते १५ पोसलेल्या गुंड साथीदारांवर वाढीव कलम ३०७ तसेच पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करून न्याय देण्यात यावा यासाबतचे निवेदन व्हाईस ऑफ मिडीया (सा.विं.) जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर, प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे, विभागीय अध्यक्ष संतोष धरमकर, संपादक मनोहर मोहोड, संजय निकस पाटील, अजय वानखडे, संदीप देशमुख, प्रजानंद उपर्वट, संघटक रमेश समुद्रे, युवा पत्रकार योगेश सिरसाट, साहित्यिक अर्जून घुगे बंधू, एजाज अहमद खान आदींच्या सह्या आहेत.
Post Views: 169