स्व.श्रीधरराव देशमुख उपाख्य मालक यांच्या श्रीधरपर्वातील जयंती महोत्सव निमित्ताने बाप्पूंचा जयंती सोहळा
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
22 Feb 2022, 1:15 PM
श्रीधर पर्व शुभारंभाचा,
हा शताब्दीवर्ष सोहळा ।
या जनांनो साजरा करूया ,
बाप्पुंचा जयंती सोहळा॥धृ॥
निस्वार्थ होते कर्मयोगी हे,
विकासाचे शिल्पकार हे ।
मायबाप मालक गावाचे,
गावाचा नित्य मनी जिव्हाळा॥१॥
बाप्पुंचा जयंती सोहळा....
शिवाजी नावाने रोप लावले,
विद्या मंदिर हे भव्य ठाकले ।
खेडोत्री मुले शिक्षित व्हावे,
बाप्पुंच्या ह्रदयी हाच कळवळा॥२॥
बाप्पुंचा जयंती सोहळा....
जातिपातीची नव्हती भिंत,
सर्व धर्म समभावाचे हे संत।
भुकेल्यांसाठी सदा दयावंत,
परोपकार अंगी वाहे खळखळा॥३॥
बाप्पुंचा जयंती सोहळा....
वैभव त्यागूनी ग्राम फुलवले ,
सुखसोईचे विकास साधले ।
मानवरूपी हे देवची अवतरले ,
गावासाठी राजा झाला मावळा॥४॥
बाप्पुंचा जयंती सोहळा....
गणमान्य पाहूणे इथे लाभले,
विश्वासाने भावपुष्प वाहिले ।
शिवाजी संस्थेचे नंदनवन फुलले,
श्रीधराने फुलवला हा मळा ॥५॥
बाप्पुंचा जयंती सोहळा....
विश्वासराव देशमुख, शेगाव (निंबा)
जयगुरू
Post Views: 286