अकोला रेल्वेस्थानकाला दररोज दहा हजाराचे महसुली नुकसान


 Sanjay M. Deshmukh  25 Nov 2021, 1:14 PM
   

अकोला, दि. २५ नोव्हेंबर :  कोरोनाकाळात ठप्प झालेली रेल्वेची प्रवासी वाहतूक सुरळीत झाल्यानंतरही पूर्णपणे सुरळीत अकोला रेल्वे स्थानकावरील पे अॅन्ड पार्क सुविधा गत दीड वर्षांपासून बंदच आहे. वार्षिक साडेदहा हजार रुपयांचा महसूल मिळवून देणारी व्यवस्था • अजूनही सुरू झालेली नसल्यामुळे रेल्वे स्थानकाला दररोज जवळपास दहा हजार रुपयांच्या महसुलास मुकावे लागत असल्याचे वास्तव आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील सर्वच रेल्वे स्थानकांवरील पे अॅन्ड पार्कची सुविधा बंद आहे. एकट्या अकोला स्थानकास दररोज दहा हजार रुपयांच्या महसुलाचे नुकसान होत असेल, तर यावरून भुसावळ मंडळातील अन्य स्थानकांना होत असलेल्या नुकसानाचा अंदाज येतो. कोरोना संसर्गामुळे गतवर्षी मार्च महिन्यात रेल्वेची चाके थांबल्यामुळे अकोला रेल्वेस्थानकावरील पे अॅन्ड पार्कची सुविधाही बंद करण्यात आली. त्यानंतर हळूहळू रेल्वेसेवा सुरळीत होत गेली.

    Post Views:  269


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व