शांता देवी च्या पुण्यतिथीनिमित्त हजारो भाविकांनी घेतला महाप्रसाद
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
2022-11-30
कापशी (मंगेश चऱ्हाटे) : अकोला ते पातुर रोडवरील कापशी रोड येथील ओम शांता देवी च्या पुण्यतिथीनिमित्त हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कापशी रोड येथील अवलीया शांता देवी ही एक जागृती देवी म्हणून पंचक्रोशीतील अनेक भाविकांना याची प्रचिती आली आहे .अवलीया शांता देवी ची अहोरात्र दिवस राऊत परिवाराकडुन पुजा अर्चना करुन सदैव सेवा करत आहेत कापशी गावासह पंचक्रोशीतील लहान बाळाला शांता देवी च्या दर्शनासाठी आणून त्यांच्या वतीन गोळ्या बिस्किट वाटण्यात येते व लहान बाळा सुखशांती ठेवण्याचे मागणी केली जाते असाच अवलीया शांता देवी ची २९नोव्हेंबर ला पुण्यातील निमित्ताने आधिल्या रात्री परिसरातील भावीक भक्तांनी भजन करुन जागरण गोंधळ करण्यात आले व सकाळी शांता देवी ची महाआरती करुन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पंचक्रोशीतील भाविकभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला
Post Views: 322