अहमदनगरमधील कारखानदारांनी शेतकऱ्यांना उसाचे योग्य दर द्यावेत - मनसेची आणि शेतकऱ्यांची मागणी


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  19 Oct 2024, 9:14 AM
   

जिल्हा प्रतिनिधी वैभव हराळ
श्रीगोंदा--अहमदनगर जिल्ह्यातील कारखाने हे कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांच्या मानाने कमी का असा प्रश्न पडतो. याचे कारण तिकडे को जनरेशन प्रकल्प बायोगॅस प्रकल्प, डिस्टीलरी असे खूप प्रोडक्ट बनवले जातात. परंतु अहमदनगर मधील काही कारखान्यात असे प्रकल्प नसल्याने या जिल्ह्यातील शेतकरी लोकांना या कारणाने  उसाला कमी दर  मिळत आहे. यामुळे हा प्रश्न उभा राहिला आहे.परंतू ज्या कारखान्यांमध्ये असे उपक्रम आहेत त्यांनी योग्य तो दर उस उत्पादकांना द्यावा अशी मागणी मनसे अध्यक्ष सहकार सेना,जिल्हा उपाध्यक्ष वैभव हराळ यांनी केली आहे.
      अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे कारखाने चालू असून त्यातून भरपूर प्रमाणात प्रोडक्ट बनवले जातात. हे कारखाने भरपूर नफ्यात चालतात.परंतू त्या प्रमाणात शेतकऱ्यांना उसाचे दर देत नसल्याने ही सहकार नव्हे तर फक्त नफा कमावण्याची दुकानदारी ठरते.बाजार दर बारामती आणि कोल्हापूर जिल्हयाच्या मानाने  टनामागे ७०० रूपयांनी कमी असतो. याचा परिणाम म्हणजे एकरी ७० टन उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांचे रू.४९००० चे नुकसान केले जात आहे.हा तोटा शेतकरी सहन करत आहे. याला कारण कारखानदारी प्लांट आहे.शेतकऱ्यांचा सहानुभूतीने विचार करून योग्य ते दर देण्यात यावेत अशी  शेतकरी वर्गाची मागणी आहे.औषधे विक्रेते आणि शासनाचा  जी एस टी हे अजून एक संकट सुध्दा शेतकऱ्यांना अडचणीत आणणारे आहे. त्यात ऊस रोप किंवा बेणे ऊस फोडणी बांधणीसाठी  दोन वेळा मंजुरी देण्याचा वेगळा एक भुर्दंड शेतकऱ्यांना असतो. खुरपण त्यात लाईट बिल हा सर्व विचित्र करता शेतकऱ्याच्या हातात काय येत असेल हा चिंताजनक विषय बनला आहे. या उस दरांची हमी  ना सरकार घेते ना कारखाना एम डी.साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचा विचार करून उस दर वाढवून द्यावेत अन्यथा या कारखानदारी धोरणाविरूध्द कायदेशीर  दाद मागीतली जाईल.मनसेचे कार्यकर्त्यांसह  या भूमिकेवर आंदोलन सुध्दा सुरू केले जाईल  असा इशारा संजय शेळके मनसे जिल्हा सचिव यांनी दिला आहे.

    Post Views:  20


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व