महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यापीठ हायस्कूल, पुणे येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला


 संजय एम.देशमुख  2023-03-09
   

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यापीठ हायस्कूल, पुणे येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला शिक्षिका व शिक्षकेत्तर भगिनींचा कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या छत्रपती पुरस्कार विजेत्या संगीता देशमुख (सिंग) व प्रशालेचे मुख्याध्यापक विष्णू मोरे यांच्या हस्ते शिक्षक प्रतिनिधी वैशाली सैंधाणे, स्मिता जाधव, गौरी गोळे, प्रमोदीनी,कबुले, संध्या आवेकर, संध्या निंबाळकर, तेजस्विनी निरगुडे, गौरी गोळे, माधुरी कऱ्हाडे,मंदाकिनी काशिद यांचा गुलाब पुष्प व कापडी पिशवी (पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून) देऊन सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी आपले मानसिक व शारीरिक आरोग्य जपायचे असेल तर मोबाईल गेम खेळण्यापेक्षा मैदानी खेळ खेळून मातीशी आपले नाते घट्ट करा. आपल्या मातृभूमीचा, मातेचा, बहिणींचा, शिक्षकांचा आदर राखा असा बहुमोल संदेश संगीता देशमुख यांनी विद्यार्थ्यांना दिला.
वैशाली सैंदाणे यांनी कर्तबगार स्त्रियांची माहिती सांगून स्त्री विषयी समाजाचा कसा दृष्टिकोन बदलत आहे हे सांगितले.
कार्यक्रमास छत्रपती पुरस्कार विजेत्या संगीता देशमुख, प्रशालेचे मुख्याध्यापक विष्णू मोरे, विलास पारडे, योगेश चव्हाण, सुभाष कांबळे, गजानन शेंडकर, सिंग हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक यांनी तर आभार योगेश चव्हाण यांनी मांनले.

    Post Views:  238


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व