बोईसर -पालघर जिल्हामधील बोईसर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या काटकर पाडा महसूली गावातील गणेश नगर येथे स्मशानभूमीकडे जाणारा गेल्या रस्ता नादुरुस्त व खराब झालेल्या असल्याने,रस्त्याचे काम MMRD फंडातून आलेला निधी मधून चालू करण्यात आले, असता वनविभाग कार्यालतून आलेल्या कर्मचाऱ्यांनी काम थांबवले. काटकर पाडा महसुली गावातील गणेश नगर ह्या ठिकाणी जुना सर्वे नंबर 107नवीन 30 ह्या वनविभागात येणाऱ्या जमिनी मधून गेल्या काही वर्षापूर्वी बनवलेल्या रस्त्याचे मजबुती करण करण्याकरीता एम एम आर डी फंडातून निधी मंजूर करून आज ते काम चालू केलेअसता वनविभागाने ते थांबवून त्वरित बंद करण्यास सांगितले. सदर कामाविषयी वनविभागाच्या वनपाल (RFO) अपेक्षासाटम मॅडम यांच्याशी संपर्क साधला असता, त्यानि प्रतिक्रिया दिली की आम्हाला दूरध्वनी वरून तक्रार आली होती म्हणून आम्ही सदर काम बंद केले आहे. तक्रारदाराचे नाव विचारले परंतु त्यांनी मौनव्रत धारण केले. ज्या सर्वे नंबर मध्ये काम चालू होते तो सर्वे नंबर वन विभागाचा असून त्या पूर्ण जागेत भू माफिया व इतर लोकांनी अनधिकृत चाळी व घरे बांधलेले आहेत. ज्यावेळेस अशी अनधिकृत कामे चालू होती तेव्हा वनविभागाचे अधिकारी कुठे होते? ज्या वेळेस भूमाफीयांनी वन विभागाच्या जागेवर घरे किंवा चाली चे अनधिकृत बांधकामे सुरु असताना थांबविलीअसती तर आज त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामे उभी राहिली नसती .असा प्रश्न जनतेला भेडसावत असून ह्या मध्ये वनविभागाच्या काही कर्मचाऱ्यांची मिली भगत तर नाही ना?अशी चर्चा सुरु असल्याचे दिसत आहे. वनविभागाच्या जमिनीवर बांधलेली अनधिकृत बांधकामावर बोईसर च्या वनपाल (RFO) अपेक्षा साटम मॅडम तोडक कारवाई करतील का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
Post Views: 284
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay