विद्यापीठ हायस्कूलमध्ये गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना
पूणे - चांद्रयान ३ या अंतराळ मोहिमेचे यश संपूर्ण भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण ठरलेल्या चांद्रयानाची प्रतिकृती महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यापीठ हायस्कूल मध्ये साकारण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात मोठ्या जल्लोषात बाप्पाच्या मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक काढली व त्यानंतर शाडू मातीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना प्रशालेचे मुख्याध्यापक विष्णू मोरे यांच्या हस्ते करण्यात आली.
आरुणि विद्यामंदिर, शिशुविहार प्राथमिक शाळा, विद्यापीठ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची पर्वणीच होती. पर्यावरणाची हानी न होता इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यावर भर देण्यात आला. उत्सव आनंदात व पर्यावरणाचे रक्षण करत साजरा करण्यात आला. यावेळी आरुणि विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका अक्षदा कुलकर्णी, शिशुविहार प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना वानखेडे, विद्यापीठ हायस्कूल मुख्याध्यापक विष्णू मोरे, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोरयाच्या गजराने सर्व प्रशालेतील वातावरण मंत्रमुग्ध झाले. भक्तिमय वातावरणात श्रीच्या मूर्तीची स्थापना केल्यानंतर सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. दुसऱ्या दिवशी भावपूर्ण वातावरणात दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप देण्यात आला.
Post Views: 155