नजरे समोर होणाऱ्या अनधिकृत बांधकामाला अधिकाऱ्यांचा आशीर्वाद...
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
18 Oct 2024, 1:29 PM
संतोष घरत - जिल्हा प्रतिनिधी
बोईसर! तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एस जे सिंथेटिक जे २०७ कारखान्याने संबंधित विभागाची कुठल्या प्रकारची परवानगी न घेताच अनधिकृतपणे बांधकाम सुरू केले.
सदर अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर दिनांक - २५/०९/२०२४ रोजी उपअभियंता , ड्रेनेज व बांधकाम विभाग यांना लेखी तक्रार देऊन सुद्धा तारापूर औद्योगिक क्षेत्राने कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्याने सदर कारखाने अधिकाऱ्यांना खिशात ठेवत बांधकाम तर सुरूच ठेवले ,परंतु अजून पुढे मंडप टाकून मोठे आलिशान दुकानही थाटले गेले आहे.
एस. जे . सिंथेटिक कुठलीही परवानगी न घेताह्या कारखानदाराने बांधकाम करून रस्त्यावरतीच मंडप घेतल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन, वाहतूक कोंडीची मोठी समस्या उद्भवलेली आहे. ह्या रस्त्याच्या लगत व कारखान्यात येणाऱ्या मालाची मोठ मोठी अवजड वाहने रस्त्याच्या बाजूलाच उभी केलेली असतात त्यामध्येच सदर कारखान्याने केलेले अतिक्रमण व उभारलेला मंडप ही त्याच्यात मोठी भर पडलेली आहे. त्यामुळे कारखान्यात येणारे कामगार , तसेच हा मुख्य रस्ता असल्याने ह्या रस्त्याने रुग्णांना घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या रुग्णवाहिका, शाळेचे विद्यार्थी ह्यांनाही त्या रस्त्याने जाताना नाहक वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. अशा या वाहतूक कोंडीमुळे मागील काही महिन्यापूर्वी एका बालकाला आपला जीव गमवावा लागला होता.
उप अभियंता ड्रेनेज व बांधकाम विभाग तारापूर बोईस ह्यांना लेखी तक्रार देऊन ही त्यांनी कोणतीच कारवाई केली नसल्याने हेच अधिकारी ह्या कारखान्यांना खतपाणी तर घालत नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारखानदार आणि अधिकारी वर्ग यांची मिली भगत तर नाही ना? अशा अनेक शंका नागरिकांना पडल्या आहेत.
Post Views: 12