कोकलगाव नवदुर्गा उत्सव उत्साहात संपन्न
देगलूर :-कोकलगाव दूर्गा माता नवरात्रोत्सव दर वर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गावातील सर्व नागरीक मोठ्या संख्यने उपस्थित होते. नवयूवक दूर्गा माता उत्सव समिती कोकलगाव अध्यक्ष सुदाम सूर्यवंशी, उपाध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, दूर्गा माता पूज्यारी शिवाजी माने, धनाजी सूर्यवंशी मित्र मंडळ, प्रकाश सूर्यवंशी ,किशन सूर्यवंशी, रवी शिंदे ,कोकलगाव चे सरपंच सौ. शेषाबाई मष्णाजी सूर्यवंशी, उप सरपंच सौ. भारतबाई व्यंकटराव लादे ,पोलिस पाटील सौ. महादेवी गुरुनाथ स्वामी, व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दूर्गा माता मिरवणूकीपूर्वी उत्सवात नऊ दिवस खेळल्या बध्दल चिमुकली मुले आणी मुली यांना उपाध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांचेकडून बक्षिस देण्यात आली.ती बक्षिसे सरपंच सौ. शेषाबाई मष्णाजी सूर्यवंशी यांच्या हस्ते देण्यात आलीत. त्यावेळी सर्व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
Post Views: 43