महापालिका निवडणुकीआधी महाराष्ट्रात पुन्हा रणधुमाळी


मविआ VS भाजप-शिंदे गट यांच्यात रंगणार लढाई
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  29 Dec 2022, 7:46 PM
   

मुंबई : विधीमंडळाचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरु असल्याने महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून ते विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून सभागृहात चांगलीच फटकेबाजी केली जातेय. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे स्वत: अधिवेशनाच्या निमित्ताने सभागृहात आले होते. या सगळ्या घडामोडी सुरु असताना एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकांनंतर आता पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. निवडणूक आयोगाने याबाबत महत्त्वाची घोषणा केलीय.

निवडणूक आयोगाने शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर केलीय. येत्या 30 जानेवारीला या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 2 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार. नाशिक, अमरावती, औरंगाबाद, नागपूर आणि कोकण विभागासाठी शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर करण्यात आलीय. दरम्यान, आगामी शिक्षक मतदारसंघात सत्ताधारी पक्ष आणि महाविकास आघाडीकडून कुणाकुणाला उमेदवारी दिली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिक्षक मतदारसंघात आपल्या उमेदवाराला संधी मिळावा यासाठी प्रत्येक पक्ष आग्रही राहण्याची शक्यता आहे. पण चर्चेअंती योग्य निर्णय घेण्यात येईल. काही दिवसांपूर्वी राज्यात ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागांवर यश मिळालं. तर त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालं होतं.

    Post Views:  152


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व