संस्कारक्षम पिढीसोबत उदयोगशील पिढी घडावी- नलीनीताई देशमुख


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  10 Mar 2022, 4:28 PM
   

अकोला : देशमुख समाज जागृती  मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिन स्थानिक मिलन सभागृह पत्रकार काॅलनी अकोला येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
 समाजातील तळागाळातील स्त्रियांच्या कार्यकर्तृत्वाचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष संजय कृष्णराव देशमुख कंझारेकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडला . देशमुख समाजातील रणरागिनींनी प्रत्येक क्षेत्रात भरारी घेतली आहे . फिटनेस, मीडिया हाऊस, हॉटेल इंडस्ट्री, लघु उदयोग, टुरिझम, शिक्षण, राजकारण, समाजकारण इ. क्षेत्रातील कर्तृत्वान महिलांच्या सन्मान समाजाच्या वतीने करण्यात आला.
 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ट अध्यापिका नलिनीताई प्रकाशराव देशमख होत्या . तर प्रमुख उपस्थिती म्हणुन पुष्पाताई देशमुख , मंदाताई देशमुख, कविताताई ढोरे , कल्पनाताई देशमुख, राजश्रीताई देशमुख,  उज्ज्वलाताई देशमुख  होत्या. महिलांनी अतिशय कष्टाने केलेली कामगिरी उल्लेखनीय असून मंडळाने त्यांचा केलेला गौरव समाजाचा अभिमान होय असे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले. महिलांनी संस्कारक्षम पिढी सोबतच उद्योगशील पिढी घडवावी असे आवाहन  नलिनीताई देशमुख यांनी केले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी असलेल्या "सन्मान मुर्ती" म्हणुन मीनाक्षी मदन देशमुख, वंदना देशमुख, हेमाताई देशमुख, गोकुळाताई देशमुख, राजश्रीताई देशमुख, संगिताताई देशमुख, शालिनीताई देशमुख, सरलाताई देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री देशमुख हिने केले तर प्रस्ताविक अँड मृणाली हरिष देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संजय कमल अशोक देशमुख यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता देशमुख समाज जागृती मंडळाचे सदस्य प्रा. संजय देशमुख, नितिन देशमुख, राजाभाऊ देशमुख रिधोरेकर, विजय देशमुख, सुजय देशमुख, राजाभाऊ देशमुख कवठळकर, अनिल देशमुख, हरिष देशमुख, यशवंत देशमुख, अंकुश देशमुख, ज्ञानेश्वर देशमुख, योगेश देशमुख, मुकेश देशमुख, संदीप देशमुख, शरद देशमुख, कुलदीप देशमुख, अनिल सरनाईक, अभिषेक देशमुख, अमोल देशमुख व अश्विन देशमुख यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला देशमुख समाजातील महिलांसह गणमान्य व्यक्ती प्रामुख्याने हजर होत्या.

    Post Views:  326


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व