वानखेड डेंग्यूचा धोका, तरीही आरोग्य यंत्रणा सुस्तच..!


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  15 Sep 2024, 6:38 PM
   

स्वप्निल देशमुख : 
वानखेड : संग्रामपूर तालूक्यातील वानखेड  गावात डेंग्यू व डेंग्यूसदृश आजाराचे रूग्ण दिसून येत असले तरी आरोग्य यंत्रणेकडून मात्र अद्याप कुठल्याच ठोस उपाययोजना आखल्याचे दिसत नाही. ना गृहभेटी सर्वेक्षण. त्यामुळे नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.
वानखेड मध्ये डेंग्यू व डेंग्यूसदृश आजाराची लक्षणे दिसणारे अनेक लहान मुले शहरातील विविध दवाखान्यात उपचार घेत आहेत. याची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दरम्यान, पावसाळ्यातील साथरोगांच्या पार्श्वभूमीवर कोणतीही विशेष काळजी घेण्यात आलेली नाही. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कीटक सर्वेक्षण व गृहभेट  दिसून येत नाही. गावच्या स्वच्छतेचा जबाबदारी असलेल्या ग्रामपंचायतींचेही याकडे दुर्लक्ष आहे. नाली काढणे, स्वच्छता राखणे हा आपला जॉबचार्ट आहे, याचाच विसर ग्रा.पं. ला पडल्याचे चित्र आहे.यामुळेच  गावात साथीच्या आजाराचा धोका बळावत चालला आहे. तापरोगांचे रुग्ण वाढत आहेत. विशेषतः बालकं यामुळे बेजार झाले आहेत. वरवट बकाल व लगतच्या शहरातील विविध दवाखान्यात डेंग्यू व डेंग्यू सदृश आजाराचे अनेक रूग्ण उपचार घेत आहेत.
 दरम्यान, वानखेड गावात डेंग्यूसदृश आजाराने डोके वर काढले असताना उपाययोजनांच्या दृष्टीने संबंधित कर्मचाऱ्यांना कामाला लावण्यात तालुका आरोग्य अधिकारी कमी पडत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, उपाययोजनांबाबत प्रशासनाची भूमिका जाणून घेण्यासाठी तालुका आरोग्याधिकारी . चौधरी मॅडम... यांच्याशी संपर्क साधला यांनी तातडीने उपाययोजना करण्याबाबत संबंधितांना सूचना देऊ, असे सांगितले.
   चौकट ..... 
सर्वेक्षण अन् गृहभेटी केेव्हा?
दरम्यान, साथरोगांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवकांनी सम, विषम क्रमांक दिलेल्या घरातील पाण्याचे साठे, तेथील कीटकांची स्थिती तपासणे गरजेचे आहे. याशिवाय आरोग्य सेविका यांनी व्यक्तिगत सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. असे असताना वानखेड गावा मध्ये गृहभेटी होतच नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. एम क्रमांकानुसार घराला पंधरवड्यातून एकदा भेटी देणं, पाणीसाठे तपासणे या कामाचे आरोग्य कर्मचाऱ्यांना सोयरसुतक राहिले नाही. यामुळे या गृहभेटी, सर्वेक्षण वाढवावे अशी मागणी होत आहे
  चौकट... 
वानखेड गावचे ग्रामसेवक बोडके यांनी पदभार घेतला तेव्हापासून ग्रामपंचायत कारभार हा सुस्त अवस्थेत पडला आहे तसेच अनेक दिवसांपासून नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असून कुठल्याही प्रकारे पाण्यात ब्लिचिंग पावडरचा वापर करण्यात येत नाही अनेक ठिकाणी घाणीची साम्राज्य व मच्छरांचा प्रादुर्भाव झालेला आहे त्यामुळे डेंगूची लागण सुद्धा येथे पाहावयास मिळत आहे अशा सुस्त कारभार चालवणाऱ्या ग्रामसेवक वर योग्य ती कारवाई करून त्याची त्यांची उचल बांगडी करणे गरजेचे आहे
--  उमेश आंबुसकर सुज्ञ नागरिक
वानखेड

ग्रामविकास अधिकारी यांनी एम एन बोडखे यांच्या म्हणण्यानुसार गावात धूर फवारणी तसेच पिण्याच्या पाण्यात ब्लिचिंग पावडर चा वापर करण्यात येत असल्याची माहिती मिळते परंतु गाव पातळीवरील नागरिकांकडून अशा कुठल्याही प्रकारे धूर फवारणी किंवा ब्लिचिंग पावडर टाकण्यात येत नसल्याचे बोलले जात आहे
ग्रामविकास अधिकारी यांनी एम एन बोडखे यांच्या म्हणण्यानुसार गावात धूर फवारणी तसेच पिण्याच्या पाण्यात ब्लिचिंग पावडर चा वापर करण्यात येत असल्याची माहिती मिळते परंतु गाव पातळीवरील नागरिकांकडून अशा कुठल्याही प्रकारे धूर फवारणी किंवा ब्लिचिंग पावडर टाकण्यात येत नसल्याचे बोलले जात आहे
प्राथमिक आरोग्य केंद्र वानखेड येथील  वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश कड यांना विचारणा केली असता त्यांनी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना माहिती दिली फवारणीसाठी गावात धुर फवारणी व पिण्याचे पाण्यात ब्लिचिंग पावडर तसेच आरोग्य आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती उपाययोजना करावी असे ग्रामपंचायत प्रशासनाला सांगण्यात आले 
- डॉ योगेश कड 
प्राथमिक आरोग्य केंद्र वानखेड वैद्यकीय अधिकारी

    Post Views:  19


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व