(मनोज भगत) तेल्हारा : नुकत्याच महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व्दारा आयोजित जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलींचा संघ विजयी झाला. हा संघ अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व अमरावती विभागस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत करणार आहे. या यशाबद्दल महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे, कार्यवाह श्यामशील भोपळे, विभागप्रमुख स्नेहल भोपळे, प्राचार्य संतोषकुमार राऊत व पर्यवेक्षक गणेश खानझोडे यांनी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक-शिक्षिका, प्रशिक्षक यांचे अभिनंदन करून पुढील विभागस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्यात. खेळाडू आपल्या यशाचे श्रेय क्रीडा विभाग प्रमुख तथा प्रशिक्षक अक्षय मोरखडे, प्रा. चेतन चुने, रवी भोयर, महिला पालक प्रतिनिधी वर्षाताई वानखडे यांना देतात.
Post Views: 145