स्वर संध्या कार्यक्रमात दिव्यांगांना शैक्षणिक साहित्याचे वाटप


जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले दिव्यांग सोशल फाउंडेशन चे कौतुक
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  15 Jun 2022, 12:14 PM
   

अकोला स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे १२ जून २०२२ रोजी खुले नाटयगृह अकोला येथे टेलिव्हिजन फेम कलावंतांचा स्वर संध्या कार्यक्रम दिव्यांगांच्या शिक्षण, आरोग्य, व रोजगारासाठी आयोजीत केला होता. मंचावर अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी निमा अरोरा, उपजिल्हाधिकारी  संजय खडसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, अकोला आकाशवाणी प्रमुख विजय दळवी, प्रा. विशाल कोरडे, भारती शेंडे व मान्यवर उपस्थित होते. 
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. हेलन केलर व लुईस ब्रेल यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले. जिल्हाधिकारी निमा अरोरा, संजय खडसे, डॉ.तरंगतुषार वारे, विजय दळवी, प्रा. विशाल कोरडे व मान्यवरांच्या हस्ते दिव्यांगांना व्हील चेअर , ब्रेल बुक, ब्रेल स्लेट, पांढरी काठी, ऑडियो सीडी व शिष्यवृत्ती चे वितरण करण्यात आले.गणितात ७ विश्वविक्रम करणारा प्रणितकुमार गुप्ता, पं.हरिप्रसाद चौरसिया यांची शिष्या कृतिका जंगिनमठ,सारेगमप फेम श्रुती भांडे, सुर नवा ध्यास नवा फेम स्नेहल चव्हाण, अभिनेत्री प्रतिक्षा देशमुख, यांचा सत्कार जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी प्रा.विशाल कोरडे व दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावर दिव्यांगांसाठी करण्यात येणाऱ्या कार्याचा गौरव केला. 
जिल्हा प्रशासन दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या सामाजिक कार्यात नेहमीच सहकार्य करेल अशी ग्वाही दिली. स्वर संध्या कार्यक्रमाच्या आयोजनतून दिव्यांग रोजगारासाठी लवकरच कार्यशाळा घेतली जाणार आहे.  प्रणितकुमार गुप्ता चे गणित प्रात्यक्षिक, कृतिका जंगिनमठ यांचे बासरीवादन ,स्नेहल चव्हाण चे सुफी गायन ,श्रुती भांडे चे सुगम गायन, धनुषकुमार ची मिमिक्री अनामिका देशपांडे चे निवेदन, प्रा. हर्षवर्धन मानकर यांच्या गझल अल्बम चे लोकार्पण, ७ वर्षाच्या अंध विद्यार्थिनी मंजिरी पांडे ची संगीत प्रस्तुती हे स्वर संध्या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. उपजिल्हाधकारी प्रा संजय खडसे यांच्या हस्ते आयोजन समितीचे विशाल कोरडे, प्रसाद झाडे, अनामिका देशपांडे, श्वेता धावडे, किर्ती मिश्रा, स्वाती झुनझुनवाला, मीनाक्षी फिरके, माधुरी कोरडे, विजय कोरडे, तृप्ती भाटिया ,अनिरुद्ध देशपांडे, मनोज कस्तुरकर यांचा सत्कार करण्यात आला. या सामाजिक उपक्रमात रोटरी क्लब अकोला (पूर्व), देशमुख महिला मंडळ , अकोल्याची जत्रा,मंगलाक्षी इव्हेंट,सिंधू सिनियर सिटिझन समिती, लिनेस क्लब अकोला, सक्षम अकोला, अकोला अर्बन बँक, बुलडाणा अर्बन बँक, यांनी आपला सहभाग नोंदवला. उत्कृष्ठ आयोजनासाठी विजय पाठक, संजय तिडके, हेमंतकुमार शाह, प्रशांत देशमुख, आनंद अग्रवाल, संजय जोशी, सूर्यकांत भारकर, सुहास गद्रे, वसंतजी खंडेलवाल, एस. एस. खरोटे, डॉ. उज्वला मापारी, डॉ.नितीन उपाध्ये ,शंतनु जोशी, सोनल कामे, रितेश मिरझापुरे, राहुल पाटील, सुबोध देशपांडे, प्रवीण पाटील, किशोर पाटील, संजय पिसे, उत्कर्ष जैन, श्रीराम पांडे, प्रमोद चव्हाळे, अमित अग्रवाल, सुनील हातेकर, सिध्देश्वर टिकार, शिवम भौरदकर, मनोज राऊत, नंदू मानेकर,हिमांशू निमकर्डे, रोहित सूर्यवंशी व अरुण गवळी यांनी सहकार्य केले.

    Post Views:  459


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व