मी अनुभवलेला एक कर्तव्यदक्ष अधिकारी ते एक संवेदनशील माणूस


कर्तव्यदक्ष कृषिअधिकारी अमोल बनसोडे
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  07 Dec 2022, 1:37 PM
   

संग्रामपुर (स्वप्निल देशमुख) : येथील तालूका कृषी अधिकारी अमोल बनसोडे एक कर्तव्यदक्ष अधिकारी एवढंच नव्हे तर ते एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व देखील आहेत. अधिकारी पदावर कार्यरत असतांना बनसोडे साहेबांनी संग्रामपुर तालूका आदिवासी दुर्गम भागात केलेली कामगिरी, शेतकऱ्यांची घेतलेली दखल, वंचितांना न्याय मिळवून देण्याची धडपड, , शिस्तबद्ध अधिकारी ते एक मनाचा संवेदनशील माणूस इथपर्यंत मी अनुभवलेला प्रवास या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
अमोल गंगाधर बनसोडे हे जिल्हा बुलढाणा तालूका संग्रामपुर येथे तालूका कृषि अधिकारी म्हणून कार्यरत आहेत  
. मूळचे रेवली, तालुका:-परडी – जिल्हा बीड येथील रहिवासी असलेले अमोल बनसोडे यांना लहानपणापासून शिकण्याची जिद्द होती. 
ऊसतोड ते कृषि अधिकारी MPSC TOPPER यांची जडणघडण झाल्याचा हा प्रवास आहे परंतु मला विचाराल तर त्याहीपेक्षा हा एक संवेदनशील व्यक्तिमत्वाचा प्रवास आहे, असे मी मानतो. अधिकारी पदावर असतांना शासकीय नियमावली नुसार कार्य करावे लागते. या सर्व गोष्टी करत असतांना जो व्यक्ती काहीतरी वेगळं करण्याची धमक दाखवतो तो अवलिया ठरतो. संग्रामपुर तालूका कृषि अधिकारी अमोल बनसोडे हे एक उत्तम अधिकारी आणि त्याहून अधिक एक उत्तम माणूस आहेत.
आदिवासी भागात कार्य करत असतांना तेथील लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा आणि त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न बनसोडे साहेबांनी अतिशय उत्तम प्रकारे केला. आवश्यक कागदपत्रे, आदिवासी पाड्यावर जाऊन  वंचितांना शासकीय लाभ तात्काळ मिळवून दिलेत.
सर्वसामान्य कुटुंबातील तरुण जेव्हा जनतेच्या मनातील सिंघम ठरतो...
कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर असावी लागते जिद्द अन कठोर मेहनत करायची तयारी.त्यातुनही प्रामाणिकपणे काम केले तर यश नक्कीच मिळते.ते दाखवुन दिले आहे अमोल बनसोडे  यांनी.जनतेत राहुन जनतेची प्रामाणिकपणे सेवा केल्याने खरेखरे सिंघम म्हणुन  हे शेकडो लोकांच्या ह्दयातील रियल हिरो ठरले आहेत.

    Post Views:  219


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व