जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त जनजागृती उपक्रम


बाबा व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राचा सामाजिक उपक्रम
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  12 Oct 2026, 1:19 PM
   

अकोला : अमरावती येथील बाबा व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या वतीने कान्हेरी सरप येथील कमलाबाई देशमुख औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मानसिक आरोग्यविषयक जाणीव व जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
     अत्यंत यशस्वी स्वरूपात पार पडलेल्या या कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा सौ. निकिताताई देशमुख तसेच प्राचार्य श्री   लांडे सर आणि  संस्थेतील कर्मचारी ठाकरे सर, चांदुरकर यांनी विशेष सहकार्य केले. सौ.निकिता देशमुख  यांनी  जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे महत्त्व विशद केले. मानसिक स्वास्थ्याची काळजी कशी घ्यावी, व सध्याच्या काळात नवीन पिढीने याबाबतीत काय दक्षता घेण्याचे महत्व अधोरेखित करीत स्वतःच्या  प्रगतीसाठी या विषयाला प्राधान्न्य देणे आवश्यक असल्याचे सांगितले. करू शकेल  याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
मानसिक आरोग्य आणि पालकांच्या भूमिकेवर मार्गदर्शन केले.
      बाबा व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या सौ. जया राघोर्ते यांनी मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय, तणाव व नैराश्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या, तसेच बदलत्या शिक्षणपद्धतीमध्ये पालकांची भूमिका आणि त्याचे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम याविषयी मार्गदर्शन केले.केंद्राचा परिचय सौ. अश्विनी देशमुख यांनी करून दिला. तसेच मानसिक आजारांविषयी समाजात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी योग्य माहिती, पुनर्वासनाचे महत्त्व व गरज यावर मार्गदर्शन केले, व मानसोपचार तज्ञ संघटना यांच्यामार्फत  सुसाईड प्रीवेंशन वरील  क्लिप सुद्धा विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली, यामध्ये आत्महत्या करण्यामागच्या भावना, त्याला प्रवृत्त करणारी विचारधारा, तसेच आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना यावर अनेक डॉक्टरांनी मार्गदर्शन केलेले आहे.
प्रश्नमंजुषेतून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन
कार्यक्रमाच्या शेवटी मानसिक आरोग्यविषयक प्रश्नमंजुषा घेण्यात आली. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्य, मानसिक आजार आणि त्यासंबंधी विविध प्रश्न उपस्थित केले. तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करून त्यांना आवश्यक मार्गदर्शन केले.
       या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कमलाबाई देशमुख  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. तसेच बाबा व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या टीममधील स्वप्निल वर्दे आणि अक्षय बनसोड यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विशेष सहकार्य केले.
मानसिक आजारांविषयी गैरसमज दूर करणे, मानसिक आरोग्याबाबत समाजात जागरूकता निर्माण करणे आणि मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तींना योग्य वेळी योग्य मदत व उपचार मिळण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा या जनजागृती कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

    Post Views:  1


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व