आम्ही सिद्ध लेखिका संस्थेत सुप्रसिद्ध गझलकार, लेखिका, समाजसेवी मा. देविका देशमुख यांचे जोरदार स्वागत...!
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
01 Oct 2024, 8:23 AM
अकोला-- आम्ही अकोला सिध्द लेखिका संस्थेच्या अकोला जिल्हा प्रमुख असलेल्या देविकाताई या मागील आठवड्यात संस्थेशी परत जोडल्या गेल्या.त्यांचे संपूर्ण कार्यकारणीच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले..
आम्ही सिद्ध लेखिका ही अखिल भारतीय महिलांची मराठी साहित्य संस्था असून एप्रिल २०२१ रोजी प्रा.पद्मा हुशिंग यांच्या अध्यक्षतेखाली या संस्थेची स्थापना झाली. आज संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्हे तसेच दिल्ली,गुजरात, गोवा येथेही संस्थेच्या शाखा आहेत. परदेशातील अनेक लेखिका संस्थेशी जोडल्या गेल्या आहेत. लिहा आणि लिहिते व्हा हे संस्थेचे ब्रीद असून जवळ जवळ तीन हजार लेखिकांचे लिहिते हात संस्थेला मजबूत करत आहेत.अनेक वाचक महिला आज लेखिका म्हणून उदयास आल्या आहेत. महाराष्ट्रातील सर्व विभागातील पदाधिकारी,जिल्हा प्रमुख संस्थेचे विश्वस्त, सल्लागार मिळून संस्थेचा मोठा कार्यभार सांभाळत आहेत.
केवळ तीन वर्षात संस्थेने सलग दोन राज्यसंमेलनाचे यशस्वी आयोजन केले आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र,कोकण,खानदेश तसेच मुंबई ठाणे या विभागातील सर्व जिल्ह्याचा सहभाग असून विदर्भातील नागपूर, अमरावती,अकोला,भंडारा, चंद्रपूर,वर्धा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांतून तीनशे लेखिका या संस्थेशी जोडल्या गेल्या आहेत. भंडा-याच्या लेखिका मा.कविता कठाणे या विदर्भ विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत..आता देविका देशमुख यांच्या आगमनामुळे विदर्भात संस्थेचा कार्यभार भक्कम वाढेल अशी खात्री संस्था अध्यक्ष प्रा.पद्मा हुशिंग यांनी व्यक्त केली..
Post Views: 163