खडकी येथे अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  16 Aug 2022, 12:17 PM
   

अकोला : स्थानिक जिल्हा परिषद नगर खडकी बु. येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये देशाचा 75 वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व आनंदात भर पावसामध्ये सुद्धा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाच्या महिला विकास समितीचे अध्यक्ष श्रीमती मंदाताई श्रीकृष्ण डगवार तर ग्रंथपाल संघटनेचे अध्यक्ष सुधाकररावजी पोळकट हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते व त्यांच्या हस्ते ध्वजावंदनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व हारअर्पण  प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मा.ग्रामपंचायत सदस्य अनिल हरणे, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी मधुकररावजी आढे, श्रीमती मंगलाताई देशमुख, रामदास पटांगे,  रामेश्वर शेळके, श्रीकृष्ण बोचे, विजयकुमार वनवे, इंदुबाई तुपलोंढे, प्रमिलाबाई गिरी, सविता शेळके, मधुकर जोशी, शेषराव शिबिले, मनोहर अहिर, आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी मार्गदर्शन केले .कार्यक्रमाचे संचालन व आभार आयोजक समाजसेवक गजानन हरणे यांनी केले .यावेळी जिल्हा परिषद नगर येथील ज्येष्ठ नागरिक, महिला तरुण युवक युवती पाण्याच्या झडीमध्ये सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता रवी बोचे ,गणेश बचे ज्येष्ठ नागरिक संघ, निर्भय बनो जन आंदोलन, सेवाश्री बहुउद्देशीय संस्था, सांप्रदायिक भजनी मंडळ, गजानन महाराज सेवा समिती, जिल्हा परिषद नगरवाशी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम शांततेत परंतु उत्साहात पार पडला. 

    Post Views:  584


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व