खासदार लंके यांच्या सहकार्याने अजय शेळके यांनी सोडविले रस्त्यांचे प्रश्न..!


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  25 Sep 2024, 8:43 AM
   

खासदार निलेश लंके समर्थक तांदळी दुमाला येथील सामाजिक कार्यकर्ते अजय भाऊ शेळके यांनी विशेष प्रयत्नातून शालेय शिक्षण घेत असलेल्या विध्यार्थी, कामगार तसेच काही शेतकरी वर्ग यांना तांदळी-टाकळी शिवरस्ता खुला करण्यासाठी शासकीय आदेश मंजूर केला आहे . याचा फायदा परिसरातील शेतकरी शाळेतील विद्यार्थी या सर्वांसाठी होणार आहे. शेतीसाठी व शेतमाल वाहतुकीसाठी रस्ते फार आवश्यक आहेत त्यासाठी सर्वांनी सहकार्य  करणे गरजेचे आहे . सदर रस्ता खुला करण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी तलाठी विस्तार अधिकारी भुमिलेख अधिकारी व तहसीलदार पोलीस प्रशासन यांना सहकार्य करावे अशी सगळ्यांची अपेक्षा आहे .   आपण ज्या गावात असतो तेथील रस्ते विकसित कसे होतील यासाठी अनेक रस्त्यांचे प्रस्ताव अजय भाऊंनी लोकनेते खासदार निलेश लंके यांच्याकडे दाखल केले आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील  गावा गावातील नागरिकांना सहकार्य ते करत आले आहेत.

    Post Views:  460


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व