आधार फाउंडेशन च्या वतीने शाडू मातीची गणेश मूर्ती कार्यशाळा संपन्न


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  03 Sep 2024, 11:23 AM
   

अकोला - दरवर्षी आधार फाउंडेशन च्या वतीने पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची स्थापना होण्याकरिता शाडू मातीच्या गणेश मूर्तीची कार्यशाळा घेण्यात येते.  प्रभाग क्रमांक 4 मधील न्यू तापडिया नगर येथील गजानन महाराज मंदिराच्या प्रांगणात ही कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेत दीडशे च्या वर स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. आपल्या माता-पितासह चिमुकल्यानी मातीचे गणेश मूर्ती साकारण्याचा आनंद लुटला या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाल मुकुंदजी भिरड, वंचित चे जिल्हाध्यक्ष प्रमोद डेंडवे, महानगरचे मनोहर बनसोड, इंजि. प्रशांत जोशी, डॉ. निखिल महाजन, डॉ. मीनल वानखडे, आधारचे अध्यक्ष माणिक शेळके, गुरुदेव सेवा मंडळाचे ऍड. वंदन कोहाडे, बंडूभाऊ शेळके, रघुनाथ फोममारे, विजय लांडे, संतोष इंगळे गुरुजी, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. कार्यशाळेला प्रशिक्षक म्हणून सदानंद कोंडे हे लाभले असून कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी आधार फाउंडेशनचे उपाध्यक्ष राहुल ठाकूर, गौरव पांडे, सुमित ठाकरे, सचिन इंगळे, सुशील ठाकरे, मंगल इंगळे, सुदर्शन राऊत, केवल ठाकूर, रोमिल घुले यांनी परिश्रम घेतले.

    Post Views:  12


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व