अकोला : देशमुख समाजातील गुणवंतांवर स्थानिक मराठा सभागृहात संपन्न झालेल्या सोहळ्यात कौतुकाचा वर्षाव करण्यात आला.
देशमुख समाज जागृती मंडळ आणि देशमुख महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित देशमुख समाजातील गुणवंताच्या प्रतिभेचा सन्मान करण्यात आला . कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून निर्माण उद्योग समूहाचे चेअरमन गणेशराव देशमुख हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून अमरावती येथील प्राचार्य डॉक्टर स्मिता देशमुख यांची उपस्थिती लाभली होती. यावेळी व्यासपीठावर देशमुख समाज जागृती मंडळाचे अध्यक्ष संजय कृष्णराव देशमुख आणि महिला मंडळाच्या अध्यक्ष्या राजश्री देशमुख उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. इयत्ता दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेत यश संपादन करणाऱ्या तसेच समाजातील उच्च पद भूषविणाऱ्या गुणवंतांचा यावेळी शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, रोपटे आणि पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून पाच सुवर्ण आणि एक कास्यपदक मिळविणाऱ्या सुवर्णकन्या पुनम देशमुख हिचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. महिला मंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या बचत गटाच्या महिलांना आणि मुलांना विविध साहित्य वाटप करून त्यातील प्रतिभावान महिलांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाला अकोला जिल्ह्यासह ईतरही जिल्ह्यातील समाजबांधवांनी उपस्थिती दिली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय कमल अशोक देशमुख यांनी केले तर संचालन गायत्री देशमुख यांनी केले. आभार नयना देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी जागृती मंडळाचे प्रा. संजय भा. देशमुख, नितीन व. देशमुख, विजय देशमुख, राजाभाऊ बा. देशमुख, राजाभाऊ दे.देशमुख, सुजय रं. देशमुख, अंकुश अ. देशमुख, यशवंत वि. देशमुख, हरीश बा. देशमुख, अनिल ज. देशमुख, मुकेश अ. देशमुख, संदीप ग.देशमुख, ज्ञानेश्वर रा. देशमुख, शरद देशमुख, डॉ. अतुल देशमुख, डॉ. नरेश देशमुख, महेश बा. देशमुख, अश्विन अ.देशमुख, योगेश शी. देशमुख, दिलीप देशमुख, पंकज देशमुख आणि देशमुख महिला मंडळाच्या कविता ढोरे, कल्पना देशमुख, स्वप्नाली देशमुख, प्रतिभा देशमुख, लता देशमुख, डॉक्टर छाया देशमुख, पुष्पा देशमुख, शैलजा देशमुख , विजया देशमुख, साधना देशमुख ,इंदू देशमुख ,जयश्री देशमुख ,सविता देशमुख ,संध्या देशमुख विजया देशमुख पूजा देशमुख ,जया देशमुख ज्योती देशमुख शुभांगी देशमुख स्वप्ना देशमुख श्वेता देशमुख अश्विनी देशमुख शिल्पा देशमुख शितल देशमुख निषा देशमुख प्राची देशमुख श्रद्धा देशमुख योगिनी देशमुख पौर्णिमा देशमुख अपेक्षा देशमुख कोमल देशमुख ऋतुजा देशमुख दीपिका देशमुख अलका देशमुख संजीवनी देशमुख ऋतुजा देशमुख मनीषा देशमुख सीमा देशमुख वैशाली देशमुख रेवती देशमुख सोनल देशमुख सारिका देशमुख रोहिणी देशमुख मंजुषा देशमुख चेतना देशमुख विशाखा देशमुख प्रांजली देशमुख सीमा देशमुख गौरी देशमुख उज्वला देशमुख वर्षा देशमुख कल्पना सरनाईक अनिता देशमुख सीमा देशमुख प्राची देशमुख स्मिता देशमुख शिल्पा देशमुख तृप्ती देशमुख शिल्पा देशमुख संगीता देशमुख वैशाली देशमुख सुषमा देशमुख नीता देशमुख ज्योती देशमुख अस्मिता देशमुख मीना देशमुख
यांनी अथक परिश्रम घेतले.
Post Views: 447