अकोला : चौधरी कोचिंग क्लासचा संचालक वसीम चौधरी यांच्याविरुद्ध अल्पवयिन विद्यार्थिनीसोबत अश्लिल चाळे केल्याप्रकरणी 22 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासानंतर अल्पवयिन मुलींसोबत मनाविरुद्ध अनैसर्गिक कृत्यू केल्याने ३७५ (३) या गुन्ह्याची वाढ करण्यात आली. या प्रकरणात नराधम वसीम चौधरी यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
चौधरी कोचिंग क्लासचा संचालक वसीम चौधरी यांच्याविरुद्ध अल्पवयिन विद्यार्थिनीसोबत अश्लिल चाळे केल्याने सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनमध्ये एका अल्पवयिन विद्यार्थिनीने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार वसीम चौधरी यांनी मुलीसोबत मोबाईलवरून अश्लिल चॅटिंग केल्याचा आरोप आहे. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून २२ मे रोजी रात्री गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्याच्याविरुद्ध अनैसर्गिक कृत्य केल्याचा गुन्हा वाढविण्यात आली. तसेच न्यायालयाने २६ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेवून न्यायालयाने ३० मेपर्यंत वसीम चौधरीला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलिस कोठडी संपल्यानंतर आरोपी वसीम चौधरीला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी केली.
Post Views: 160