धावत्या रेल्वेत चोरी, चोरट्यास नऊ महिन्याचा कारावास


 पंकज देशमुख  04 Dec 2021, 6:11 PM
   

अकोला : विदर्भ एक्स्प्रेसने वर्धा ते दादर प्रवासा दरम्यान बॅगेतील रोख रक्कम लंपास करणाऱ्या चोरट्यास न्यायालयाने नऊ महिने कारावासाची व 500 रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास 15 दिवस अधिक कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. 

भाईंदर पूर्व येथील देवराव भुसारी वय 68 हे 22 मार्च 2021 रोजी विदर्भ एक्स्प्रेसने वर्धा ते दादर प्रवास करीत होते. दरम्यान मूर्तिजापूर येथून गाडी सुटताच त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम चोरी गेली. मूर्तिजापूर येथून गाडी सुटल्यावर आपल्या बॅगेतील रोख रक्कम चोरी गेल्याचे भुसारी यांच्या लक्षात आले. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला. तपासात अमीर जान मो.शेख रा.मुंबई हा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. न्यायालयाने आरोपी अमीर जान मो.शेख रा.मुंबई यास नमूद गुन्ह्यात 9 महिने कारावासाची शिक्षा व 500 रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास 15 दिवस अधिक कारावासाची शिक्षा देण्यात आली. गुन्ह्याचा तपास पोलिस अधिक्षक राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक शिंदे, ठाणेदार सपोनि रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनात विलास पवार तसेच कोर्ट पैरवी म्हणून गोपाळ सोळंके यांनी केली.

    Post Views:  180


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व