हेलिकॉप्टर अपघातात आतापर्यंत तब्बल 13 जणांचा मृत्यू, 1 गंभीर जखमी


 संजय देशमुख  08 Dec 2021, 5:07 PM
   

तामिळनाडू : तामिळनाडू हेलिकॉप्टर दुर्घटनेत आतापर्यंत 13 मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर एकजण गंभीर असल्याचं कळतंय. तामिळनाडूत झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपीन रावत गंभीर जखमी झाले आहेत. बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावतही अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये होत्या. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबतची अधिकृत माहिती अद्यापतरी समोर आली नाही. त्यामुळे सर्वांची चिंता वाढली आहे.

राजनाथ सिंह उद्या संसदेत माहिती देणार

तामिळनाडू हेलिकॉप्टर दुर्घटनेची सविस्तर माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उद्या संसदेत देण्याची शक्यता आहे. त्याआधी राजनाथ सिंह घटनास्थळी भेट देण्याचीही शक्यता आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिनही काही वेळात घटनास्थळाला भेट देणार आहेत.  तर वायुसेनाप्रमुख घटनास्थळाकडे रावाना झाले आहेत. ते घटनास्थळी जाऊन पाहणी करणार आहेत.

राष्ट्रपतींचा दरबार हॉल कार्यक्रम रद्द

लष्करप्रमुखांचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याकारणाने राजभवनमधील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणारा दरबार हॉलचा कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे. अशी माहिती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिली. त्यामुळे या भीषण हेलिकॉप्टर अपघातानंतर राष्ट्रपतींनीही आपल्या नियोजित कार्यक्रमात बदल केल्याचे दिसून येत आहे.

बिपीन रावत यांच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवला

आपघात जखमी झालेले सीडीएस बिपीन रावत यांच्या दिल्लीतील घराबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर दुसरीकडे राजनाथ सिंह यांनी सुरक्षादलाची बैठकही घेतली आहे.

    Post Views:  194


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व