जीवनात आनंद मिळण्यासाठी निष्काम कर्म मह्त्वाचे : जेष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ. रविंद्र भोळे


 संजय देशमुख  31 Jan 2022, 12:44 PM
   

उरुळीकांचन : जगाच्या कल्याणासाठी संतांच्या विभूती-देह  झीजविती परोपकारे, ह्या सत्ं  श्रेष्ठ तुकाराम महाराज ह्यांच्या अभंगाप्रमाणे साधू, संत, योगी, तपस्वी, ऋषी, मुनी, महंत ह्यांचे जीवनकार्य असते. आसक्ती मुक्त राहून जगाचे कल्याण व आत्मिक शांती व मोक्षप्राप्ती ह्यासाठी जीवनात सात्विक कार्ये महत्वाची असून जीवनात आनंद मिळण्यासाठी समर्पित भावनेने निरंतर, निरपेक्षपणे निष्काम कार्ये उपयुक्त असतात, असे मत जेष्ठ समाजसेवक डॉ. रविंद्र भोळे महाराज, अध्यक्ष डॉ. मणिभाई देसाई मानवसेवा ट्रस्ट उरुळीकांचन ह्यांनी येथे व्यक्त केले. डॉ. रविंद्र भोळे ह्यांच्या वतीने आरोग्य सेवा केंद्राच्या सहकार्याने सरस्वती शाळेत सॅनिटाझर व मास्क वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ह्याप्रसंगी त्यांनी आपले मत व्यक्त केले. कोरोना पँडेमिक कालावधीत डॉ. रविंद्र भोळे  ह्यांनी महत्वपूर्ण भरिव सेवा कार्य केलेले आहे. यावेळी सरस्वती शाळेचे  शिक्षक संजय कुंजीर, मेमाने मॅडम व शिक्षक उपस्थित होते.  

    Post Views:  291


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व