पुस्तक विक्रेत्यांचा निर्धार आम्ही मतदान करणार दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या जनजागृती कार्यक्रमाला अकोलेकरांचा भरभरून प्रतिसाद
अकोला:- दि.१७ एप्रिल २०२४ रोजी मतदार साक्षरता अभियान जिल्हा अकोला चे ब्रँड अँबेसिडर व दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे संस्थापक अध्यक्ष डॉ.विशाल कोरडे यांनी अकोल्यातील सुप्रसिद्ध चिवचिव बाजार परिसरात मतदार साक्षरता अभियान राबविले* .*जुने पुस्तक खरेदी व विक्री असोसिएशन अकोला तर्फे डॉ.विशाल कोरडे यांना मतदार साक्षरता अभियान कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते* . असोसिएशन च्या दुकानात आलेल्या प्रत्येक ग्राहकाला व नागरिकांना दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले.असोसिएशनच्या सदस्य व उपस्थित ग्राहकांनी 26 एप्रिल रोजी मतदान करण्याचा संकल्प घेतला . *असोसिएशन चे अध्यक्ष महेंद्र हरणे यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या मतदार साक्षरता अभियानाचे कौतुक केले. संस्थेतर्फे संपूर्ण अकोला जिल्ह्यात जनजागृतीपर कार्यक्रम घेतल्यामुळे अकोला जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी नक्कीच वाढणार असल्याचे मत व्यक्त केले . सदस्य कमल किशोर अग्रवाल यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या प्रत्येक सामाजिक उपक्रमात जुने पुस्तक खरेदी व विक्री असोसिएशन अकोला नेहमी सहभागी होईल असे अभिवचन दिले .यावेळी एकच निर्धार आम्ही मतदान करणार या घोषणेसह चिवचिव बाजार परिसरातील सर्व आस्थापनांना डॉ.विशाल कोरडे व दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या सदस्यांनी भेट देऊन मतदान करण्याचे आव्हान केले.ज्या दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाचे सहकार्य हवे आहे त्यांनी संस्थेच्या ९४२३६५००९० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा,अशी माहिती सदस्य अस्मिता मिश्रा यांनी दिली*. मतदार साक्षरता अभियान कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे अनामिका देशपांडे,अंकुश काळमेघ,विजय कोरडे,सिद्धार्थ ओवे,गणेश सोळंके तर असोसिएशनचे महेंद्र हरणे,आशिष म्हशितकर,नीरज वासुदेव सांगोळे,कमलाकर पाटील,कमल किशोर, महेंद्र कुमार अग्रवाल,नितीन दळवी,
राहुल जाधव,गोपाल हरणे,
योगेश जाधव,श्रीकांत डाबरे,
वासुदेवजी सांगोळे,चेतन दळवी व अरविंद केशवार यांनी सहकार्य केले.
Post Views: 149