कोणत्याही देशाची व्यवस्था व अवस्था यांची जमेची बाजू म्हणून तिथला तरूण व सुशिक्षित वग॔ यांकडे पाहिले जाते. किंबहुना ते त्या देशाचे खरे भांडवल ठरू शकते.. केवळ याचा सुयोग्य वापर होणे खुप महत्वाचे असते.. व त्याच्या वापरावरच देशाची स्थिती गती व प्रगतीही ठरते.. तरूण वग॔ जेवढा सुशिक्षित , सुसंस्कृत, व्यवसायिक शिक्षणाने व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असेल आणि सव॔ स्तरावर सक्रिय असेल तेवढी अधिक प्रगती साधणे कुठल्याही देशाला सहजशक्य होवू शकते...
परंतु जर तोच तरूणवग॔ व्यसने, गुन्हेगारी किंवा निष्क्रिय होवू पाहत असेल तर मात्र त्याचे खुप गंभीर असे दूरगामी परिणाम होवू शकतात.. आपल्या देशातही खुप मोठा तरूणवग॔ व त्यातही सुशिक्षित ,उच्चशिक्षित व तंत्रज्ञानयुक्त मोठा तरूणवग॔ आहे.. परंतु तो केवळ नोकरी व चांगले पॅकेज यांमध्येच अडकून पडलेला आढळतोय ही खुप गंभीर बाब होवू शकते... याचा आतातरी सर्वानी मिळून विचार करणे; व प्रत्यक्ष कृती होणे गरजेचे आहे...
वास्तविक आपला तरूणवग॔ हा व्यावसायिक शिक्षणाने परिपूर्ण व ऊत्पादक होणे खूप महत्वाचे आहे.. म्हणजेच केवळ प्रचलित शिक्षण घेवून नोकरीसाठी वणवण फिरणारा तरूणांचा घोळका न होता.. कोणत्यातरी व्यवसायाचे प्रशिक्षण घेवून व अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त स्वतः उत्पादक होणे ही खूप महत्वाची व जमेची बाजू होवू शकते..व ते क्रमप्राप्तच आहे...
सुशिक्षीतांचा राजकीय सहभाग हादेखील अत्यंत महत्वाचा व गंभीर विषय आहे.. सध्याच्या वेळेनुसार सतत बदलती राजकीय परिस्थिती व त्यामुळे भविष्यात होणारे दूरगामी गंभीर परिणाम यामुळे ढवळून निघणारे तणावग्रस्त वातावरण, बेरोजगारी व इतर अनेक महत्वाच्या विषयांबाबत तरूणपिढी व सुशिक्षीतांनी जाणीवपूर्वक केलेली डोळेझाक यांमुळे निर्माण होणाऱ्या वातावरणातील गंभीरता फारसी गांभीर्याने घेतली जात नाही.. ही खुप चिंतनीय बाब आहे.. अनेक सुशिक्षित लोक या विषयाला फारसे गांभीर्याने घेत नाहीत व केवळ विनोदापुरते, सोशल मिडीयापुरते किंवा ऊपहासात्मकपणे टिप्पणी करणे यासाठीच याकडे पाहतात..परंतु याचे गांभीर्य समजून घेवून त्यामध्ये सकारात्मक बदल करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करण्याचा विचारही करत नसतील तर ते दुर्भाग्य म्हणावे लागेल... अनेकजण तर अनेक विषयांतील डिग्री घेवून काही अशिक्षित किंवा स्वतःची स्वाक्षरीही करता येत नसलेल्या लोकांच्या हाताखाली कमी पगारात नोकरी करून आपले जीवन जगण्यात धन्यता मानतात... येथे केवळ सुशिक्षितांनी व उच्चशिक्षितांनीही केवळ नोकरीच्या मागे न धावता स्वतः उत्पादक होण्यासाठी प्रयत्नशील व्हावे असंच अभिप्रेत आहे... कुणालाही दुखविण्याचा काहीच हेतू नाही..फक्त सुशिक्षित व उच्चशिक्षित यांचा सव॔त्र असणारा प्रत्यक्ष सहभाग किती महत्वाचा ठरू शकतो याचे गांभीर्य लक्षात येण्यासाठी उदाहरणादाखल दाखला दिलेला आहे....
वास्तविक तरूणवग॔ , सुशिक्षीतवग॔ व उच्चशिक्षित यांचा नोकरीव्यतिरिक्त व्यवसाय उद्योगधंदे, राजकीय क्षेत्रातही सहभाग वाढल्यास खूप सकारात्मक बदल होवू शकतो. अनेकजण राजकीय क्षेत्राकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात.. तसेच अनेकजण मतदानाचा हक्क किंवा अधिकाराबाबतही उदासीन असल्याचेही दिसून येते.. अनेकठिकाणी साठ-सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होवू शकत नसेल तर ही खुप चिंतनीय बाब आहे... आपल्या देशाच्या सव॔ जगात महान ठरू पाहणाऱ्या महान राज्यघटनेने सर्व भारतीयांना दिलेला मतदानाचा खुप मोठा व खुप महत्वाचा अधिकार आहे.. परंतु स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे अनेकजण आपला मतदानाचा हक्क न बजावता ती सुट्टी एन्जॉय करण्यासाठी दिवस वाया घालवतात. परंतु त्यांचा आजचा हाच एन्जॉय पुढील अनेक पिढीचे भविष्य ठरविणारा महत्वाचा दुवा आहे; याचे भानही असे काही महाभाग विसरून गेल्याचे जाणवते.. परंतु याकडे दुर्लक्ष म्हणजे एकप्रकारचा नाकर्तेपणा ठरू शकतो.. हेदेखील ध्यानीमनी असावे..
त्यात बदल करण्यासाठी स्वतः सहभागी होवून प्रत्यक्ष काहीतरी कृती केल्याशिवाय बदल होणार नाहीत.. याचा विसर अनेकांना झाल्याचे आढळते. व हा विषय काहीसा चेष्टेचा विषय होवून त्यामुळे दिघ॔कालीन गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते याचाच मुळी विसर पडताना आढळतोयं.. परंतु ही खूप गंभीर बाब आहे व त्याकडे दुर्लक्ष केल्याने आपल्या पुढील अनेक पिढीला किती गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते याचे भान आतातरी ठेवणे खुप महत्वाचे आहे.. याकडे किमान आतातरी लक्ष देवून सुशिक्षीत व उच्चशिक्षितांचा सहभाग वाढणे खुप गरजेचे होवू पाहत आहे...
सुशिक्षीत व उच्चशिक्षित यांचा सहभाग वाढल्यास व त्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा सुयोग्य असा वापर केल्यास खुप मोठा सकारात्मक बदल नक्कीच होवू शकतो.. तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासकीय कामकाजात गतिमानता येवून, अनेकानेक यशोशिखरे सहज पादाक्रांत करून त्याव्दारे आपल्या देशाला सर्वोच्च स्थानी नेता येईल.. त्यासाठीची गरज फक्त सव॔ क्षेत्रांप्रमाणेच उद्योग व्यवसाय व राजकीय क्षेत्रात सुशिक्षित व उच्चशिक्षित यांचा प्रत्यक्ष सहभाग व कृतीची... असं झाल्यास फारच कमी कालावधीत खुप मोठा सकारात्मक बदल व प्रगती सहजशक्य आहे..
तेंव्हा सुशिक्षित व उच्चशिक्षित यांनी प्रत्यक्ष सहभागी होवून कृती करण्याची हीच खरी वेळ आहे व ती काळाची गरजही आहे.. याचा पुरेसे गांभीर्याने विचार करून कृती करावी.. अन्यथा आपणास राजकीय परिस्थिती व इतर परिणाम यांविषयी भाष्य करण्याचा नैतिक अधिकारही नाही..
कारण बोलणारे व सल्ला देणारे खुप भेटतात... परंतु या सर्वाकडे दुर्लक्ष करून व वेळप्रसंगी काही सल्ले यांचा सुयोग्य वापर करून स्वतःच लढणारे खुप कमी असतात.. व असेच लोकं काहीतरी करतात व असेच लोक इतिहासही घडवतात... हेही ध्यानात ठेवणे महत्वाचे ठरेल...
पै. श्री. अभिजीत वि.भालेराव (कोंढवा बुद्रूक, पुणे)
मो.9822788172
Post Views: 236