पुणे भूगोल शिक्षक संघ, पुणे आयोजित व्याख्यान - नवीन शैक्षणिक धोरण


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  05 Sep 2022, 11:41 AM
   

पुणे भूगोल शिक्षक संघ, पुणे तर्फे नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर मा. विकास गरड प्राचार्य तथा उपसंचालक (आयटी व प्रसारमाध्यम, समन्वय) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे. यांचे व्याख्यान श्री. ना. दा. ठाकरसी कन्या शाळा, नारायण पेठ, पुणे- ३० येथील सभागृहामध्ये पार पडले. नवीन शैक्षणिक धोरणातील संभाव्य बदलांबाबत त्यांनी हसत खेळत समर्पकपणे उदाहरणे देऊन शिक्षकांना मार्गदर्शन केले. पुणे शहर व जिल्ह्यातून या व्याख्यानाला 207 शिक्षक उपस्थित होते.                               
       पुणे भूगोल शिक्षक संघाच्या विश्वस्त माधवी तुरेकर, अध्यक्षा अलका काळे, कार्यवाह विष्णू मोरे, उपाध्यक्षा संध्या माने, श्री. ना.दा. ठाकरसी कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका शामला पांढरे, कार्यकारिणी सदस्य लक्ष्मण मालुसरे, कल्पना शेरे, संध्या गाढवे, खुणे सुचिता, वैदेही दिवेकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता करंदीकर यांनी केले.

Connection failed: Operation not permitted