आज न्यू इंग्लिश हायस्कूल अकोला येथे ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने शिवजयंती साजरी
आज न्यू इंग्लिश हायस्कूल अकोला येथे ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने शिवजयंती साजरी केली याप्रसंगी* कार्यक्रमाचे संचलन श्री. नंदकिशोर थुटे सर यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला हातात घेउनी तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्राचा असा शिवाजी राजा होऊन गेला. मंचावरील उपस्थित मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शाळेचे उपमुख्याध्यापक श्री.रेलकर सर एमसीव्हीसी विभागाचे प्रमुख श्री. दंडे सर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी श्री. बुटे सर माध्यमिक प्रर्यवेक्षिका सौ.अंजली दंडे मॅडम प्राथमिक पर्यवेक्षक श्री. तारे सर या सर्व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मानाचा मुजरा करून दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली वर्ग ५ ते १२मधील विद्यार्थी कुमारी प्राची आपोतीकर कु. ज्ञानेश्वरीअंकुरकार, अब्दुल कुरेशी,सुरज डोंगरे, सुजल घोगरे यांनी महाराजांच्या कार्याचा थोडक्यात परिचय करून दिला ऑनलाइन भाषणे दिली ऑनलाइन ची लिंक सौ. धबाले मॅडम श्री उदय कोल्हेकर सर आणि सौ.अलका मुंडे मॅडम त्यांनी ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थी भाषणे ऐकवली विद्यार्थ्यांना कार्यक्रमात सहभागी करून घेतले शिक्षकांमधून सर्वप्रथम श्री.गोपाल सांगूनवेडे सर यांनी प्रशासक कसा असावा याविषयी महाराजांचे विचार प्रकट केले तसेच शिवमुद्रे वरील कोरलेल्या अक्षरांची ओळख करून दिली त्यानंतर श्री रत्नपारखी सर यांनी पाण्याचे नियोजन शिवकालीन तलाव आजही आपणास खुणावतात या विषयी माहिती दिली तर कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे उपमुख्याध्यापक श्री. रेलकर सर यांनी शिवाजी महाराजांच्या काळात आई, बहिणी कशा सुरक्षित होत्या याविषयी माहिती दिली रयतेच्या स्वराज्याची कल्पना स्पष्ट केली.गड कील्ले यांचे महत्व सांगितले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले आभार प्रदर्शन श्री.कोकीळ सर यांनी केले. कार्यक्रम मोठ्या उत्सवात साजरा झाला जय भवानी जय शिवाजी!!!!!????????????????
Post Views: 235