जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते पाचशे वृक्षांची लागवड


 विश्वप्रभात  22 Sep 2025, 8:55 PM
   

(सामाजीक वनीकरण , पोलीस स्टेशन खदान व अकोला गार्डन क्लब  यांचा संयुक्त उपक्रम) पाचशे सुदॄढ व चांगल्या वृक्षांचा  वृक्षारोपणाचा कार्यक्रम वन विभाग अकोला अंतर्गत अटल आनंदवन शिवापूर(अकोला) येथे उत्साहात संपन्न झाला.
सदरहु हरित उपक्रमाचा शुभारंभ अकोल्याचे पोलीस अधिक्षक  अर्चित चांडक  व अकोला गार्डन क्लबचे अध्यक्ष श्री संजय शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला. सदरहु वृक्षारोपण कार्यक्रमात पर्यावरण पुरक अशा अर्जुन , अमलतास, करंज, पिंपळ, वड ,कांचन, निम,  या वृक्षांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.  याप्रसंगी बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक म्हणाले की शहर हिरवेगार करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यातही खदान पोलीस स्टेशनचे  ठाणेदार मनोज केदारे यांनी पुढाकार घेऊन गार्डन क्लबच्या या चांगल्या उपक्रमाला सुरुवात केल्याने आम्ही पोलीस डिपार्टमेंट सुद्धा या चांगल्या कामात सहभागी झाल्याचा आम्हाला आनंद आहे. यापुढेही पोलीस विभागाच्या वतीने विविध ठिकाणी वृक्षारोपण व वृक्ष संगोपनाचे कार्य हाती घेतले जाईल अशी ग्वाही सुद्धा यावेळी त्यांनी दिली.
या प्रसंगी अप्पर पोलीस अधिक्षक  चंद्रकांत  रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, पोलीस स्टेशन खदान चे पोलीस निरीक्षक  मनोज केदारे व कर्मचारी वर्ग तसेच  सामाजीक वनीकरण चे  गायकवाड  अटल आनंदवन चे कर्मचारी,  अकोला गार्डन क्लब चे अध्यक्ष संजय शर्मा, उपाध्यक्ष शरद कोकाटे, सचिव श्याम गोटफोडे, वृक्षारोपण प्रोजेक्ट डायरेक्टर निशीकांत बडगे,  दिनेश पारेख,  सुनिल कवीश्वर, भूषण ताजणे, विजय ढवळे, संतोष अग्रवाल, संदिप महल्ले, संजय आगाशे, आलोक खंडेलवाल, विजय शाह, दिवाकर पाटील, माधव पाटील, प्रविण इंगळे, अकोला इंडस्ट्रीज चे सचिव नितीन बियाणी, कृष्णा गोवर्धन शर्मा, जयेश ठोसर, रुपेश कांमळे, प्रदीप राजपूत, रघुनंदनजी खंडेलवाल, केशव आलोक खंडेलवाल  यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचे कार्य केले.

    Post Views:  58


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व